🛑महिलांच्या आरोग्यासाठी मासिक पाळीतील स्वच्छतेवर भर — वेर्ले येथे महिला मेळावा संपन्न.
*🛑महिलांच्या आरोग्यासाठी मासिक पाळीतील स्वच्छतेवर भर — वेर्ले येथे महिला मेळावा संपन्न.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेर्ले, दि- २७:-* मासिक पाळीच्या काळात स्वच्छता, संतुलित व लोहयुक्त हलका आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली यावर विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक असून सॅनिटरी पॅड वेळेवर बदलणे, हात स्वच्छ ठेवणे तसेच वापरलेली उत्पादने योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे. यामुळे संसर्ग टाळून महिलांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते, असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक व जनसेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी श्रीमती द्वारका लिंगवत यांनी केले.
डॉ. संजीव लिंगवत यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा प्रतिष्ठानतर्फे वेर्ले येथील समतानगर येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्यांनी मासिक पाळी दरम्यान गुप्तांगांची स्वच्छता स्वच्छ पाण्याने करणे, सुती कपड्यांचा वापर करणे व धुतलेले कपडे कडक उन्हात वाळवणे या गोष्टींचे महत्त्व विशद केले. तसेच आहारात पालक, बीट, कोथिंबीर, संत्री, मोसंबी व नाचणी यांचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वैयक्तिक स्वच्छतेच्या संदर्भात डॉ. संजीव लिंगवत यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित महिलांना श्रीमती द्वारका लिंगवत यांच्या हस्ते सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
रमाई बचत गट व सावित्रीबाई बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी डॉ. संजीव लिंगवत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत आरोग्य सेविका दिव्या कदम यांनी केले. तर आभारप्रदर्शन वैश्ववी नाईक यांनी केले.
या महिला मेळाव्यास शामल जाधव, संजीवनी नाईक, प्रतिज्ञा कदम, संगीता कदम, मनिषा कदम, कांचन कदम, कविता कदम, चैताली जाधव, यशिता नाईक, अमरजा कदम, पूजा कदम, कादंबरी कदम, अंकिता जाधव, लक्ष्मी कदम, श्रेया कदम, दामिनी जाधव आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अंतिम आभारप्रदर्शन अंकिता जाधव यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

