🛑कुडाळ तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद शाळेत स्मार्ट लर्निंग स्टुडिओ.
*🛑कुडाळ तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद शाळेत स्मार्ट लर्निंग स्टुडिओ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २७:-* मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये माजी विद्यार्थी मेळावा घेऊन शाळांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन केले होते त्याला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद लाभत आहे याच आव्हानाचे फळ म्हणजे पडवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी स्मार्ट लर्निंग स्टुडिओ प्रोजेक्ट रूम संगणक कक्ष उपलब्ध करून दिला आहे.. यासाठी शाळेचे व माजी विद्यार्थ्यांचे या उपक्रमाचे आपण विशेष कौतुक करीत आहोत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पडवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवदशाब्दी माजी विद्यार्थी स्नेह संगम कार्यक्रमात केले.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पडवे येथे शाळेच्या स्थापनेला 21 डिसेंबरला 90 वर्षे पूर्ण झाल्याने नवदशाब्दी माजी विद्यार्थी स्नेहसंगम हा आगळावेगळा कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
खेबुडकर यांनी पडवे शाळांनी केलेले या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.मराठी शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत बोलताना मराठी भाषा टिकली पाहिजे मराठी शाळा टिकली पाहिजे.शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन करावे यासाठी शिक्षक पालक व समाजाने एकत्र येऊन मेहनत घ्यावी असे आवाहन केले. प्रफुल्ल वालावलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले निवेदन पंढरीनाथ तेंडुलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन तुकाराम कसालकर यांनी केले.
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे विशेष बचत गटांमधील महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली दैनंदिन कामे कमी वेळेत व अधिक प्रभावीपणे करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाले पाहिजे. हे आपले स्वप्न आहे यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे सांगत यांनी बचत गटातील महिलांसाठी लवकरच आपल्या जिल्ह्यात दोन अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज मॉल उभारण्यात येणार असल्याचे माहिती खेबुडकर यांनी दिली.
खेबुडकर यांनी शिकवण्याची पद्धत बदला यासोबत भविष्य घडवा असे आवाहन जिल्ह्यातील शाळा शिक्षक व माजी विद्यार्थी यांना केले होते या ट्रेक लाईनने प्रेरित होऊन लोकसभागातून लाखो रुपयाची विकासकामे शाळेमध्ये करण्यात आली आहेत.असे यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सांगितले तब्बल 15 लाख रुपये किमतीच्या या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.यामुळे आजच्या संगणकीय युगात पडवे शाळेचे विद्यार्थी मागे राहणार नसून आधुनिक सुविधायुक्त शिक्षण घेण्यास विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

