आजच्या संपादकीय लेखाने पोलिस यंत्रणा खरडून जागी- कारवाईचा बडगा.
आजच्या संपादकीय लेखाने पोलिस यंत्रणा खरडून जागी- कारवाईचा बडगा.
उघड्यावर फुकणारे,नशेडी,गांजाडे सैरभैर – तोंड लपवायलाही राहिली नाही जागा
सावंतवाडी –
नशेची आग, पोलिसांची झोप आणि उध्दवस्त होणारी पिढी, उघड्यावर सोडतायेत नशेडी धुर, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध होताच पोलिस यंत्रणा खरडून जागी झाली व हे नशेडे,गांजाडे ,थरथरणारे ,धडधडणा रे हुडी हुडी,भरलेले दिवसभरासाठी गायब झालेत. या बातमीच्या आधारे फुकेरी गावातील सरपंच व जागृत युवकांनी आपण लेखा मध्ये फुकेरी शब्द वापरला मात्र आपल्या गावात अशा प्रकारची नशा केली जात नाही फुकेरी शब्द आपल्या लेखात असल्यामुळे आमच्या गावच्या नावाची नाहक बदनामी होते असे सांगून कृपया वाईट कृत्य करणाऱ्या युवकांच्या बातमीत फुकेरी नाव नको अशी विनंती केली.
गांजा चरस,दारु अशा प्रकारचे व्यसन फुकेरी गावात होत नसेल तर त्या गावाचा आम्हाला एक सजग नागरिक म्हणून अभिमान आहे.त्या गावात अशा प्रकारच्या अंमली पदार्थाला जर थारा दिला जात नसेल तर त्या गावाचा सन्मानच केला पाहिजे असे आमचे मत आहे.
स्मशानभूमीच्या क्रिया कर्म करणाऱ्या त्या जागेचा पार्ट्यांसाठी उपयोग केला जातो, या ठिकाणी दारूच्या पार्ट्या, नशा केली जाते. खरे तर हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार आपण स्मशानभूमीत प्रवेश केल्यानंतर घरी आंघोळ केल्याशिवाय प्रवेश करत नाही, मात्र आपली संस्कृती हरवलेली ही गांजाडी नशेडी ,माणसे या सगळ्यावर पाणी सोडत नशेमध्ये डुंबून तसेच घरात प्रवेश करतात त्यामुळे हिंदू संस्कृतीची विटंबना त्या नशाबाज युवकांकडून होत आहे
काही ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये ते युवक दिसत आहेत,त्यामुळे काही जणांनी फोन करून व्हिडिओ डिलीट होतो काय बघा -अशा प्रकारच्या विनवण्या करणारे फोन केले मात्र असे वर्तन करताना किंवा स्मशानभूमी च्या क्रियाकर्म करणाऱ्या जागेत अशा प्रकारचे व्यसन करताना पहिल्यांदा विचार करायला हवा होता तो न करता परिस्थिती अंगाशी आली की गया वया करायची ही पद्धत आता रूढ झाली आहे .पोलिसांनी याप्रकरणी कठोर पावले उचलून अशा सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्या युवकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. आजच्या संपादकीय लेखामुळे तालुक्यातील पोलीस यंत्रणा हडबडली, शाळा ,कॉलेज, रुग्णालय यांच्या 500 मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास ,ओढण्यास बंदी आहे, असे असतानाही अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो असे संपादकीय लेखात लिहिल्यावर पुन्हा एकदा पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवत कारवाईचे संकेत दिले. ही कारवाई कायम स्वरूपाची असावी अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.

