कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

मुंबई : कणकवली नगरपंचायत निवडणूकीतील शहर विकास आघाडीचे उमेदवार तथा कणकवली नगरपंचायतचे नूतन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, माजी आमदार राजन तेली, प्रथमेश तेली आदी उपस्थित होते. कणकवली नगरपंचायत निवडणूकीत शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी शहर विकास आघाडीला जाहीर पाठिंबा देत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या विजयासाठी मेहनत घेतली होती. त्यामुळे कणकवलीची लढत राज्यात लक्षवेधी ठरत नगराध्यक्ष निवडणुकीत संदेश पारकर यांनी भाजपाचे उमेदवार समीर नलावडे यांचा १४५ मतांनी पराभव करून विजय मिळवला. आमदार निलेश राणे हे संदेश पारकर यांच्या विजयाचे किंगमेकर ठरले होते. या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर नूतन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज रात्री उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!