🛑स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ.
*🛑स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २२:-* जिल्ह्यातील अकरावी व बारावी तसेच अकरावी व बारावीनंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यर्थ्यांनी https://hmas.mahait. org या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती याप्रमाणे आहेत. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा. सदर महाविद्यालयातील अकरावी, बारावी तसेच अकरावी व बारावीनंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असावा.विद्यार्थ्यास मागील अभ्यासक्रमास ५० टक्यापेक्षा जास्त गुण असावेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ४० टक्के इतकी राहील.
सन २०२४-२५ वर्षामध्ये स्वाधारसाठी नोंदणी केलेले तसेच चालू वर्षात २०२५-२६ मध्ये प्रवेशित विद्यार्थी स्वाधारसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची पीडीएफ व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह १ जानेवारी, २०२६ पर्यंत नजीकच्या मुलांचे, मुलींचे शासकीय वसतिगृह, महाविद्यालय व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय येथे समक्ष किंवा टपालद्वारे परिपूर्ण अर्ज सादर करावेत.
संबंधित महाविद्यालयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात आलेले आहे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त चिकणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८८२ येथे सपंर्क साधवा, असे आवाहन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

