कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शिरशिंगेतील सामाईक जमिनीवर दलालांचा डोळा!

*🛑शिरशिंगेतील सामाईक जमिनीवर दलालांचा डोळा!*

 

*🛑शिरशिंगे ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा – अनधिकृत खरेदी-विक्रीला तात्काळ बंदी घालण्याची मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

 

*🎴सावंतवाडी, दि- २२:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरशिंगे गावातील सामाईक जमिनींवर धनाड्य दलाल व एजंटांचा घाला सुरू असून, गरीब व अशिक्षित शेतकऱ्यांना कवडीमोल भावाचे आमिष दाखवून बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहार राजरोसपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप शिरशिंगे ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व तहसीलदार सावंतवाडी यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार सादर करत तात्काळ बंदीचे सक्त आदेश देण्याची मागणी केली आहे.

ग्रामस्थांच्या निवेदनानुसार, शिरशिंगे गावातील सर्व्हे नं. ३२, ३३, ३४, २०, ९९, २७ व २८ हे सर्व क्षेत्र सामाईक जमिनीत मोडते. गावातील खरीप क्षेत्र वगळता जवळपास ८० ते ८५ टक्के क्षेत्र सामाईक स्वरूपाचे आहे. यामध्ये विशेषतः सर्व्हे नं. ३२/१/ब हा सर्वात मोठा सर्व्हे नंबर असून त्याचे एकूण क्षेत्र ६९१.८५ हेक्टर इतके आहे. या एका मिळकतीतच ८५० पेक्षा अधिक सहहिस्सेदारांची अविभक्त सामाईक मालकी आहे.हिस्सेवाटप नसताना व्यवहार कसे? – गंभीर प्रश्नसदर सामाईक जमिनीचे अद्याप न्यायालयीन सरस-निरस धडेवाटप झालेले नाही, प्रत्येक सहहिस्सेदाराचा स्वतंत्र हिस्सा निश्चित झालेला नाही. असे असतानाही काही दलालांनी कायद्याला बगल देत खरेदीखते केली असून, हीच जमीन पुन्हा जास्त किमतीत विकण्याचे प्रयत्न सुरू असल्याची खात्रीलायक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

गरीब शेतकऱ्यांवर दबाव, धमक्या आणि फूट पाडण्याचे प्रकार

निवेदनात धक्कादायक बाबी उघड करताना ग्रामस्थांनी नमूद केले आहे की,विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर साम, दाम, दंड, भेद या सर्व प्रकारांचा वापर केला जात असून,गावातील एकजूट मोडून कलह निर्माण केला जात आहे.

यामुळे भविष्यात सामाजिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.शासकीय यंत्रणेवरही संशय सदर व्यवहार करताना सर्व ho सहहिस्सेदारांना कायदेशीर नोटीस न देता, काही शासकीय कार्यालयातील यंत्रणेला आमिष दाखवून दस्तऐवज नोंदवले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व दस्तऐवज नोंदणी प्रक्रियेत सहभागी घटकांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.‘हस्तांतरण थांबवा’ – ग्रामस्थांची ठाम भूमिका जोपर्यंत न्यायालयामार्फत कायदेशीर धडेवाटप होऊन प्रत्येकाचा हिस्सा स्वतंत्र होत नाही,तोपर्यंत सदर जमिनीवर

✔ खरेदी-विक्री

✔ गहाण

✔ बक्षीस

✔ भाडेकरार

✔ कोणतेही हस्तांतरण

करू नये, असे सक्त आदेश द्यावेत,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कारवाई नाही तर जबाबदारी प्रशासनाची!जर या बाबीकडे दुर्लक्ष झाले, तर भविष्यात उद्भवणाऱ्या न्यायालयीन खर्चास व कायदेशीर परिणामांस संबंधित दलाल,अधिकारी व यंत्रणाच जबाबदार असतील, असा थेट इशारा शिरशिंगे ग्रामस्थांनी दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!