कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी–वेंगुर्त्यातील विजय हा संघटनशक्तीचा परिपाक भाजप युवा नेते विशाल परब यांची सावंतवाडीत पत्रकार परिषद; ‘

राज्यात भाजपचा ३००+
नगरसंस्थांचा विक्रम;

सावंतवाडी–वेंगुर्त्यातील विजय हा संघटनशक्तीचा परिपाक
भाजप युवा नेते विशाल परब यांची सावंतवाडीत पत्रकार परिषद; ‘

विजयाने भारावून न जाता पाच वर्षांत विकास दाखवू’

सावंतवाडी | प्रतिनिधी
राज्यात झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये ३०० हून अधिक नगरसंस्था जिंकत भाजपने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला असून या यशामागे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हेच खरे शिल्पकार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी केले. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयाचा आढावा घेतला.प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर जनतेने ठाम विश्वास दाखविल्याचे सांगत परब म्हणाले, “मी पक्षाचा लहान कार्यकर्ता आहे; मात्र पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. म्हणूनच सावंतवाडी आणि वेंगुर्त्यात भाजपला मोठा कौल मिळाला.”विजयाने भारावून न जाता सर्वांना सोबत घेणार
विजयानंतरची भूमिका स्पष्ट करताना परब म्हणाले, “या यशाने भारावून जाणार नाही. विजयी तसेच विरोधी नगरसेवकांना सोबत घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करू. पुढील पाच वर्षांत ‘विकास काय असतो’ हे प्रत्यक्ष दाखवून देऊ.”
केसरकरांच्या होमपीचवर भाजपचा दणदणीत कौल परब यांनी माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर थेट निशाणा साधत, “केसरकरांच्या होमपीचवर भाजपने मोठा विजय मिळवला आहे. त्यांची राजकीय जादू आता संपली आहे,” असे ठाम विधान केले. हा कौल जनतेने बदलासाठी दिलेला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
*निलेश राणेंचे कौतुक; टीकेला उत्तर देणार नाही*
पत्रकार परिषदेत परब यांनी आमदार निलेश राणे यांचे खुलेपणाने कौतुक केले. “निलेश राणेंच्या कठीण काळात मी त्यांच्या सोबत होतो. त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही गैरसमज झाले; त्यामुळे माझ्यावर टीका झाली. मात्र, त्या टीकेला मी उत्तर देणार नाही,” असे ते म्हणाले.नारायण राणेंबाबत गैरसमज; तरीही टीका नाही
खासदार नारायण राणे यांच्याबाबत बोलताना परब म्हणाले, “नारायण राणे आमचे वरिष्ठ नेते असून आमच्यासाठी वडीलधारी आहेत. काहीजण त्यांना चुकीची माहिती देतात आणि त्याच आधारे ते माझ्याबाबत बोलतात. त्यांच्या विजयात माझाही वाटा आहे; तरीही मी त्यांच्यावर कोणतीही टीका करणार नाही.”
*कणकवलीचा पराभव जिव्हारी; मी तिथे असतो तर निकाल बदलला असता*
कणकवलीतील निकालाबाबत स्पष्ट मत मांडताना परब म्हणाले,
“कणकवलीचा पराभव जिव्हारी लागला. मी तेथे गेलो असतो, तर कदाचित निकाल भाजपच्या बाजूने लागला असता.”
*संघटनशक्तीवर विश्वास; विकासाचा अजेंडा ठाम*
या पत्रकार परिषदेतून विशाल परब यांनी संघटनशक्ती, नेतृत्वावरचा जनतेचा विश्वास आणि आगामी विकासाचा ठोस अजेंडा स्पष्ट केला. विजय हा शेवट नसून सुरुवात असल्याचे सांगत त्यांनी येणाऱ्या पाच वर्षांत सावंतवाडी–वेंगुर्त्याचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!