कोकणराजकीयसंपादकीयसिंधुदुर्ग

*सिंधुदुर्गचा ‘किंगमेकर’ ठरलेला नेता : आमदार निलेश राणेंनी दाखवून दिलं नेतृत्व म्हणजे काय!*

*सिंधुदुर्गचा ‘किंगमेकर’ ठरलेला नेता : आमदार निलेश राणेंनी दाखवून दिलं नेतृत्व म्हणजे काय!*

*जिल्ह्यात शिवसेना ताट मानेने उभी आहे,त्याचे श्रेय आमदार निलेश राणे यांनाच जाते*

सिंधुदुर्ग –
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांनी एक गोष्ट निर्विवादपणे सिद्ध केली आहे — सत्ता मिळते गणिताने, पण सत्ता घडते नेतृत्वाने!
आणि हे नेतृत्व जर कुणी दाखवले असेल, तर ते कुडाळ–मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे यांनी.
मालवण नगरपरिषद ही केवळ एक निवडणूक नव्हती, तर ती प्रतिष्ठेची, जिद्दीची आणि राजकीय कसोटीची लढाई होती. पंधरा दिवस डोळ्यांत तेल घालून, रात्रंदिवस मैदानात राहून, सत्ताधाऱ्यांचेच प्रताप उघडे पाडत, प्रसंगी अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेत पारदर्शक, थेट आणि निर्भय निवडणूक कशी लढवायची हे निलेश राणेंनी दाखवून दिले.
“आमचे १५, तुमचे ५… आमचे १२, तुमचे ८” अशा आकडेमोडीत भाजप आत्मविश्वासात असताना,“मालवण आपणच जिंकणार” असा ठाम पण करणारा नेता एकटाच उभा होता — आणि तो नेता म्हणजे निलेश राणे.
आज निकालाने स्पष्ट सांगितले — हा आत्मविश्वास हवेतला नव्हता, तर जमिनीवर केलेल्या कामाचा परिणाम होता!
*कणकवलीतही नेतृत्वाची छाप*
मालवणपुरतेच नव्हे, तर कणकवलीत. आपल्या शिवसेना पक्षाला सन्मान दिला जात नाही, खासदार नारायण राणे यांचा अंतीम असणारा शब्द विचारता घेतला जात नाही,व फक्त चार पाच जागांची मागणीही धुडकावली जाते शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनवरील फोटो हटवला जातो याने दुःखी झालेल्या आमदार निलेश राणे यांनी थेट शहर विकास आघाडीला पाठिंबा देत प्रत्यक्ष मैदानात उतरून, नगराध्यक्ष आणि नगरसेवक घडवण्यात निलेश राणेंनी निर्णायक भूमिका बजावली.नावापुरते पाठबळ नव्हे, तर प्रत्यक्ष नेतृत्व — यालाच राजकारणात वजन असते.आज भाजपलाही समजून चुकले असेल की शिवसेनेशी युती केली असती तर नगरपंचायत हातातून गेली नसती.
*कुटुंब फोडण्याचे प्रयत्न फसले*
काही हीत शत्रुनी ,मीडियाच्या घटकांनी राणे कुटुंबात फूट पाडण्याचे प्रयत्न केले.पण “निवडणूक निवडणुकीसारखी लढवली जाते, त्यानंतर शत्रुत्व राहत नाही” हे छातीठोकपणे सांगत निलेश राणेंनी परिपक्व राजकारण काय असते हे दाखवले.
मालवण नगरपरिषद निवडणुकीत आमदार निलेश राणे यांना घेरण्याचा प्रयत्न झाला, खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तरीही न डगमगता पक्षाशी प्रामाणिक राहण्याची भूमिका त्यांनी कधीच सोडली नाही.जिथे असेन तिथे शंभर टक्के प्रामाणिक हे राणेंचे मुळ तत्व त्यांनी कधीच सोडले नाही आणि डोक्यात स्पष्ट धोरण ठेवून ते उभे राहिलेत,जो कार्यकर्ता त्यांच्या आमदारकीच्या निवडणुकीत राबराब राबला त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत म्हणूनच आज जिल्ह्यात शिवसेना ताट मानेने उभी आहे.
पण ‘किंगमेकर’ कोण?
चार नगरपरिषदांपैकी —दोन ठिकाणी भाजप-एका ठिकाणी शिंदे शिवसेना
एका ठिकाणी शहर विकास आघाडी
हे संपूर्ण चित्र कुडाळ–मालवण मतदारसंघाचे आमदार डॉ. निलेश राणे नसते तर शक्यच झाले नसते.
अवघ्या एका वर्षाच्या आमदारकीत जनतेशी संवाद, थेट भेटी, आपुलकी, कामाचा वेग आणि परिणामाची पर्वा न करता घेतलेले निर्णय —
याच गुणांमुळे आज सिंधुदुर्गात शिंदे शिवसेना ताठ मानेने उभी आहे.
दिलदार नेतृत्वा ला कौल जनतेने दिला“सत्ताधाऱ्यांशी वैर नव्हते, तत्त्वासाठी भांडलो; निवडणूक संपली, भांडण संपलं”असं जाहीरपणे सांगणारा नेता दिलदार असतो — आणि जनतेला असेच नेते आवडतात.
म्हणूनच मालवण व कणकवलीत जनतेने भरघोस मतांनी सत्ता त्यांच्या हाती दिली.
*निष्कर्ष*
आज निलेश राणे हे केवळ आमदार नाहीत,ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसेनेचे खरे ‘किंगमेकर’ आहेत.
त्यांनी पुन्हा एकदा हे नेतृत्व अधोरेखित केल्याबद्दल आमदार डॉ. निलेश राणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन
आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!