कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑जिल्ह्यात ४ जानेवारीपर्यंत मनाई आदेश.

*🛑जिल्ह्यात ४ जानेवारीपर्यंत मनाई आदेश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १९:-* जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये,जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७ (३) नुसार २१ डिसेंबर रोजी सकाळी ६ पासून ते ४ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ पर्यंतच्या कालावधीसाठी संपूण जिल्ह्यात मनाई आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-२०२५ नगरपरिषद सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण तसेच नगरपंचायत कणकवली यांच्या निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने २ डिसेंबर रोजी निवडणूक झालेली असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.या निवडणुकींची ४ नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.

२५ डिसेंबर रोजी ख्रिश्चन धर्मियांचा नाताळ सण, ३१ रोजी वर्ष समाप्ती व १ जानेवारी रोजी नववर्ष स्वागत दिवस साजरा होणार आहे. जिल्हयात गावागावांमध्ये यात्रा, उत्सव सुरु आहेत. वैयक्तिक व सामाईक मागणीसाठी उपोषणे, मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको सारख्या आंदोलनात्मक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येते.अशावेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट तसेच जिल्हयात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रस्ता रोको या सारख्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये.जिल्ह्यातील जातीय सलोखा,कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहवी,यासाठी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!