🛑डाॅक्युमेंटरी स्पर्धेत घारपी शाळेची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
*🛑डाॅक्युमेंटरी स्पर्धेत घारपी शाळेची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- १९:-* शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या डाॅक्युमेंटरी या स्पर्धा प्रकारात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी या शाळेची कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०२५-२६या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षक,अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत घारपी शाळेचे मुख्याध्यापक जे. डी.पाटील यांनी डाॅक्युमेंटरी या स्पर्धा प्रकारात सहभाग नोंदवला होता.
या डाॅक्युमेंटरीमध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध साहित्याची विक्री करून जमा केलेल्या निधीतून मराठवाड्यातील पूरग्रस्त शाळांमधील विद्यार्थ्यांना मदत या प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रमाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे.
या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाची दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून,या स्पर्धेत यश मिळाल्यास अंतिम राज्यस्तरीय स्पर्धा गोंदिया येथे संपन्न होणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शाळेतील सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य,तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
घारपी शाळेच्या या निवडीमुळे शाळा,शिक्षक, विद्यार्थी व परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

