🛑 बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर स्मृतिदिनानिमित्त इंग्रजी विभागाची वक्तृत्व स्पर्धा संपन्न
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ला, दि-१८:- बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमासाठी संस्था प्रतिनिधी सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्ष शिवानी देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे–देसाई, पेट्रन कौन्सिल सदस्य दौलतराव देसाई तसेच प्रशासनाधिकारी पृथ्वी अजित मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. डी. बी. गोस्वामी यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी खर्डेकर साहेबांचे आदर्श गुण आत्मसात करावेत, अशी भावना व्यक्त केली. यावेळी नॅक समन्वयक प्रा. एस. एच. माने यांनी वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडतो, असे मत मांडले.
या स्पर्धेत प्रथम वर्ष कला विभागातील स्वरा गंगावणे हिने प्रथम क्रमांक पटकावला. वेदश्री चव्हाण (इयत्ता बारावी, विज्ञान) हिने द्वितीय क्रमांक मिळविला, तर तृतीय वर्ष वाणिज्य विभागातील विधी नाईक याने तृतीय क्रमांक पटकावला. मुग्धा गावडे व पार्थ कोळंबकर हे विद्यार्थी उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले.
सदर वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. धनश्री पाटील, प्रा. प्रियांका प्रभू व प्रा. राम चव्हाण यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख डॉ. मनीषा मुजुमदार यांनी करून स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शर्वरी कांबळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. संदीप वर्पे यांनी केले.
या कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

