आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 मा. दीपक लढढा यांना द टाईम्स ऑफ इंडिया चा स्टार एज्युकेशन पुरस्कार – २०२५ प्राप्त

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-१८:- येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा यांना The times of India चा स्टार एज्युकेशन पुरस्कार- २०२५ प्राप्त झाला आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सदर पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. The times of India स्टार एज्युकेशन मार्फत वेगवेगळया पुरस्कारांचे वितरण केले जाते. सामाजिक औद्योगिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. मा. दीपक लढढा यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट विश्वस्त म्हणून या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गेली 15 ते 20 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात तसेच व्यावसायिक व क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. सतत कार्यरत राहून खेड तालुक्याचा शैक्षणिक प्रगतीचा ध्यास घेऊन प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच वरिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर उत्कृष्ट दर्जाचे निकाल देणे, स्पर्धा परीक्षा व विविधक्रीडांमध्ये उत्तुंग यश मिळवून देणे त्याचप्रमाणे नावीन्यतेचा ध्यास घेणे व सकारात्मक दृष्टीने विचार करणे हे तत्त्व उराशी बाळगून सतत कार्यरत राहणे हे त्यांचे वैशिष्टय. Times of India च्या ग्रूपने या सर्व कार्याची दखल घेऊन योग्य व्यक्तीला मिळालेला पुरस्कार आहे व हा पुरस्कार खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल अशा व्यक्तीला मिळाला हे सर्व ज्ञानदीप परिवाराला अभिमानास्पद आहे.

मा. दीपक लढढा यांनी आज अखेर

• संस्थापक सदस्य , विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी – ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी)

• चेअरमन नियामक मंडळ व महाविद्यालयीन विकास समिती ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य मोरवंडे – बोरज ता. खेड

• अध्यक्ष – शिवाजीयन्स फुटबॉल क्लब , खेड

• माजी जिल्हा प्रमुख – भारतीय विद्यार्थी सेना , रत्नागिरी

• माजी अध्यक्ष – युवा माहेश्वरी समाज , खेड

• माजी अध्यक्ष – गुजर आळी मित्रमंडळ, खेड

• विशेष कार्यकारी अधिकारी – (SEO) इ अनेक सन्मानाची पदे क्रीडाक्षेत्र सामाजिक क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्रात भूषविली आहेत

या पुरस्कराबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!