कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑तुळस येथे २८ डिसेंबर रोजी चित्रकला व रंगभरण स्पर्धा.

*🛑तुळस येथे २८ डिसेंबर रोजी चित्रकला व रंगभरण स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*वेंगुर्ले, दि- १२:-* सांस्कृतिक आणि सृजनशील कलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांच्या वतीने रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता श्री रामेश्वर मंदिर, तुळस येथे खुल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लहानग्यांपासून ते माध्यमिक विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना सहभागी होण्याची संधी मिळणार असून यासाठी एकूण पाच गट निश्चित करण्यात आले आहेत.

बालवाडी आणि पहिली–दुसरी या दोन गटांसाठी रंगभरण स्पर्धा होणार आहे. इयत्ता तिसरी–चौथी गटासाठी “आवडते खेळणे”, इयत्ता पाचवी–सातवी गटासाठी “नदीकिनाऱ्याचे मंदिर”, तर इयत्ता आठवी–दहावी गटासाठी “कोकणातील कौलारू घरे” हा चित्रकलेचा विषय ठेवण्यात आला आहे. रंगभरण आणि तिसरी–चौथी गटातील स्पर्धकांनी तेलरंग अथवा स्केच पेनचा वापर करणे अनिवार्य असून पाचवी ते दहावी गटासाठी जलरंगाचा वापर बंधनकारक आहे. सर्व गटांसाठी कागद आयोजक उपलब्ध करून देणार आहेत. स्पर्धकांनी शालेय ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. गुणांकनात रंगसंगती, कल्पकता आणि सादरीकरण या निकषांना प्राधान्य दिले जाणार आहे.

रंगभरण (दोन्ही गट) आणि तिसरी–चौथी गटातील चित्रकलेसाठी प्रथम ४४४, द्वितीय ३३३, तृतीय २२२ तसेच दोन उत्तेजनार्थ १५५–१५५ अशी मेडल व प्रमाणपत्राची पारितोषिके ठेवली आहेत. पाचवी–सातवी आणि आठवी–दहावी गटातील चित्रकलेसाठी प्रथम ५००, द्वितीय ३००, तृतीय २५० आणि दोन उत्तेजनार्थ २००–२०० अशी मेडल व प्रमाणपत्राची बक्षिसे दिली जाणार आहेत.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सागर सावंत (मो. ९१५८४५४५९५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!