🛑सीताराम गावडे यांचा ५४वा वाढदिवस जल्लोषात साजरा.
*🛑सीताराम गावडे यांचा ५४वा वाढदिवस जल्लोषात साजरा.*
*🛑समाजकार्याची उब, पत्रकारितेचा अभिमान आणि लोकांचे अफाट प्रेम यांचा विलक्षण मिलाफ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १२:-* वरिष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांच्या ५४व्या वाढदिवसानिमित्त काल संपूर्ण दिवस उत्साह, आपुलकी आणि भावनिक क्षणांनी उजळून निघाला. पहाटे देवदर्शनाचा शांत, पवित्र स्पर्श घेत गावडेंनी दिवसाची सुरुवात केली. श्री देव पाटेकर व उपरलकर यांच्या चरणी वंदन करून समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या नव्या उर्मीने त्यांनी दिवसाच्या प्रवासाला सुरुवात केली.यानंतर अनाथ मुलांना ‘मायेचा हात’ देत गावडेंनी आपल्या वाढदिवसाला हृदयाला भिडणारे सामाजिक रूप दिले. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी हास्य हा दिवसाचा सर्वात मोठा आशीर्वाद ठरला.
दुपारी एक वाजता सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने माजगाव येथील अलकानंद सभागृहात पत्रकार सागर चव्हाण, मंगल कामत आणि सीताराम गावडे यांचा संयुक्त वाढदिवस सोहळा भावूक वातावरणात पार पडला.
अभिमन्यू लोंढे, विजय देसाई, शिवप्रसाद देसाई, सचिन रेडकर यांनी गावडेंच्या निर्भीड, परखड आणि अपराजित पत्रकारितेच्या वाटचालीचा भावनिक आढावा घेत कौतुकाचा वर्षाव केला.फोमंतो ग्रुपचे संचालक व संपादक संजय ढवळीकर यांनी “गावडे यांनी दडपशाहीसमोर कधीही माघार घेतली नाही. त्यांच्या निर्भय लेखनामुळे समाजाला दिशा मिळाली,” अशा शब्दांत गौरव करत सभागृह दुमदुमून टाकले.
संध्याकाळी ५ वाजता कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या मुख्य कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात आला. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला मोठा मानाचा मुजरा दिला. जवळपास दोन तास हा सोहळा सुरू राहिला आणि प्रत्येकाकडून “सीताराम गावडे हे आमचे आवाज आहेत” अशी भावनिक दाद मिळत राहिली.
रात्रो ८.३० वाजता गावडे कुटुंबियांच्या वतीने वाढदिवसाचा आणखी एक सोहळा रंगला. आपल्या पत्रकाराचे प्रेम व्यक्त करण्यासाठी चाहत्यांनी, ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शुभेच्छांचा महापूरच आणला. मध्यरात्रीपर्यंत शुभेच्छांची मालिका सुरूच होती.
या कार्यक्रमाला आकार देण्यासाठी पुतणे सागर गावडे व प्रथमेश गावडे यांनी मनापासून परिश्रम घेतले. जेवणव्यवस्थेपासून पाहुणचारापर्यंत प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पार पाडत संतोष गावडे, प्रथमेश, सागर आणि साहिल गावडे यांनी सर्व पाहुण्यांचे प्रेमाने सत्कार केले.
आज संध्याकाळी पाच वाजता इन्सुली डोबाशेळ येथील गो शाळेत जाऊन गायींना अन्न दान केले,गायींच्या सहवासात काही क्षण आनंददायी गेल्याचे संपादक सीताराम गावडे यांनी सांगितले.व प्रत्येकाने आपला वाढदिवस असाच गोशाळेला मदत करुन साजरा करावा तरच आपल्या गो माता वाचतील व आपल्याला पुण्य कर्म प्राप्त होईल असे आवाहन केले.
फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि मोबाईलवरून शुभेच्छांचा ओघ उसळला. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सीताराम गावडे भावुक झाले“आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी प्रेरणेचा दिवा आहेत. हे प्रेम मला सत्यासाठी लढण्याचे नवे बळ देत राहील.”असा विश्वास व्यक्त केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

