कोल्हापूरमहाराष्ट्रशासकीय

🛑मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल प्रकरणात न्यायालयाचा कडक दणका.

*🛑मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल प्रकरणात न्यायालयाचा कडक दणका.*

 

*🛑१७ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राचा अल्टिमेटम – १८ ला निर्णायक सुनावणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कोल्हापूर, दि- ११:-* सावंतवाडीच्या बहुचर्चित मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल प्रकरणात आज कोल्हापूर खंडपीठाने राज्य शासनाला थेट कडक अल्टिमेटम देत १७ डिसेंबर २०२५ पर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले. न्यायमूर्ती मकरंद काणेंक आणि अजित बी. कडेठाणकर यांच्यासमोर सुनावणी झाली. प्रकरणाचा वेग आणि न्यायालयीन भाषेतील तीव्रता पाहता… हा संपूर्ण मुद्दा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

अभिनव फाऊंडेशन तर्फे वकिल महेश राऊळ आणि एम.एस. भांदिगरे यांनी दमदार बाजू मांडताना स्पष्ट केले की —टाऊन प्लानिंगनुसार भूखंड क्रमांक ५ मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलसाठीच आरक्षित आहे.

सध्याच्या जागेवर वाद असेल तर पर्यायी आरक्षित जागा उपलब्ध असून त्यावरच हाँस्पिटल उभारावे, यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

दरम्यान, राज्य शासनाचे वकिल श्री. काळेल व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले की—

पर्यायी जागेची तपासणी करण्यात आली आहे.बांधकाम विभागाकडून फिजिबिलिटी रिपोर्ट मागवला आहे.जागा नगरपालिका कार्यक्षेत्रात असल्याने कार्यवाहीची जबाबदारी सावंतवाडी नगरपरिषद यांच्यावर आहे, पण प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय आहे.

जमिनमालकांनी स्पष्ट शब्दात कळवले आहे की — “जमीन हाँस्पिटलसाठी द्या… किंवा आरक्षण हटवा!”यावर न्यायालयाने स्पष्ट शब्दात फटकारा दिला :“नगरपरिषद काही करत नसेल तर राज्य शासनाने तातडीने कार्यवाही करा आणि प्रश्न मार्गी लावा.”

न्यायालयाच्या या कडक निरीक्षणानंतर प्रशासनात मोठी हालचाल सुरू झाली असून… १८ डिसेंबरची सुनावणी राज्य शासन, जिल्हाधिकारी, नगरपालिका आणि बांधकाम विभागासाठी ‘फायनल टेस्ट’ ठरणार आहे.

आता चेंडू पूर्णपणे राज्य शासनाच्या कोर्टात!सावंतवाडीच्या जनतेचा बहुप्रतीक्षित मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल प्रत्यक्षात येणार का?की पुन्हा हे प्रकरण पायात अडकलेल्या बॉलप्रमाणे रेंगाळणार?

१७ डिसेंबरपर्यंत राज्य शासन काय प्रतिज्ञापत्र दाखल करते, कोणती भूमिका घेते, आणि १८ डिसेंबरला न्यायालय काय निर्णय देते… याकडे संपूर्ण जिल्ह्याचे डोळे खिळले आहेत!

पुढील ४८ तास सावंतवाडीच्या आरोग्य व्यवस्थेच्या भवितव्याचे ठरवणारे!

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!