कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑’ओंकार’ पुन्हा दोडामार्गच्या दिशेने.

*🛑’ओंकार’ पुन्हा दोडामार्गच्या दिशेने.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- ११:-* सावंतवाडी तालुक्यातून गोव्यात गेलेल्या ओंकार हत्तीला आता दोडामार्ग तालुक्यात तिलारीच्या दिशेने नेण्याचे काम वनविभाग करीत असल्याचा दावा ग्रामस्थ करीत आहेत. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कळणे हद्दीत त्याने प्रवेश केला. तळकट, कोलझरच्या दिशेने त्याला नेण्यात येणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांत होती. घाटमाथ्यावरून माघारी फिरलेल्या कळपात पुन्हा ओंकारला समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कळपापासून विलग झालेल्या ओंकारने गेल्या काही महिन्यापासून सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात ठिय्या मांडला होता. दोडामार्ग तालुक्यात आक्रमक असलेल्या ओंकारने बांदा व गोवा परिसरात पाऊल ठेवताच शांत व संयमीपणाचे दर्शन घडवून आणले.

वन विभागाचे जे कर्मचारी त्याच्यापासून शंभर मीटर अंतरावरही जाण्यास धजावत नव्हते, ते कर्मचारी अगदी खाद्य तोंडात घालण्यापर्यंत त्याच्या जवळ जात असल्याचे पाहायला मिळाले. ओंकारने आपल्या उग्र रुपाचा त्याग करून सामंजस्याचे दर्शन घडविल्याने सर्वजण अचंबित झाले. ओंकार हत्ती या विषयावरून बांदा परिसरात अनेक उलथापालथ झाली. प्राणीप्रेमी व शेतकऱ्यात संघर्षाचे वातावरणही निर्माण झाले. बांद्यातील प्राणीप्रेमींनी ओंकारला ‘वनतारा’ येथे नेण्याच्या प्रश्नावरून आवाज उठवीत आंदोलन छेडत प्रखर विरोधाची भूमिका घेतली. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे दोडामार्ग तालुक्यातील जे शेतकरी हत्तींच्या उपद्रवामुळे हैराण झाले होते,त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

ओंकार हत्ती सध्या दोडामार्गच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर, वन विभाग त्याला तिलारीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. बुधवारी ओंकार गोव्यातून कळणे परिसरास दाखल झाला. त्याला तळकट-कोलझर येथे नेण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे तेथील शेतकरी पुन्हा भयग्रस्त झाले आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!