कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑”परंपरेच्या राजकारणाला पैशाची लागणः राजापूर मतदारसंघाची वेदना”

*🛑”परंपरेच्या राजकारणाला पैशाची लागणः राजापूर मतदारसंघाची वेदना”*

 

*🛑”नाथ पै ते राणे: कोकणच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास की नव्या लढाईची नांदी?”*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रासंगिक : काका कुडाळकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ०६:-*”आमच्या परंपरेचा, विचारांचा आणि राजापूर मतदारसंघाच्या कर्तृत्वाचा अंत सुरू झालाय का?कोणतंही लिहिण्यापूर्वी एकच प्रश्न माझ्या छातीत खुपतो—आपल्या राजापूर लोकसभा मतदारसंघाचा शतकोत्तर वारसा, विचारांची परंपरा आणि भारतभर असलेला बोलवाला… आपण खरोखर संपवायला निघालो आहोत का?

मी अगदी लहान होतो तेव्हा समाजवादी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची धडपड, त्याग आणि विचारांचा सुगंध घराघरात दरवळत असे.कैलासवासी बॅरिस्टर नाथ पै यांचे पोस्टर लावण्यासाठी कार्यकर्ते स्वतः खळ बनवायचे, स्वतःच्या पैशाने पोस्टर काढायचे, आणि घरांच्या भिंतीवर चिकटवताना अभिमानानं ‘हे आमच्या नेत्याचं’ असं म्हणायचे.

तेव्हा पैसा नव्हता — विचार होते.

नेत्यांच्या आचाराचा पगडा होता.

नंतर मधु दंडवते, मग मेजर सुधीर सावंत, आणि पुढे सुरेश प्रभू—त्यानंतर खासदार म्हणून तरुणपणी स्वीकारलेली जबाबदारी स्विकारताना डॉक्टर निलेश राणे यांनी 21 व्या शतकाचे व्हिजन जनतेसमोर ठेवण्याचा केला प्रयत्नही विसरता येत नाही

प्रत्येकाने या भूमीत विचारांचा दिवा पेटवत ठेवला. विद्वत्तेने, संस्काराने, आणि नैतिकतेने लोकांची मनं जिंकली.1990 नंतर या मार्गावर एक नवा, आक्रमक आणि दूरदर्शी नेता आला—माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायणराव राणे.त्यांनी विकासाचे राजकारण कोकणात आणलं.जनतेनं ते पैशामुळे नाही—प्रेमामुळे, विश्वासामुळे,आणि नेतृत्वाच्या धाडसी कामगिरीमुळे स्वीकारलं.त्या काळात आमच्यासारख्या

कार्यकर्त्यांची फौज उभी राहिली, पण कोणत्याही आर्थिक आमिषामुळे नव्हे.नेत्याच्या प्रेमावर, दिलेल्या शब्दावर, आणि जनतेसाठी उभ्या केलेल्या कर्तृत्वावर.त्यांच्या एका इशाऱ्यावर पाय मोडला तरी धावत जाण्याची हिंमत आमच्याकडे होती.आता त्या काळाची आठवण आली की अंगावर शहारा येतो—

शंभर रुपयात बूथवरील कार्यकर्ता दिवसभर फिरायचा, वडापाव खायचा आणि मतदानाची आकडेवारी अभिमानाने सांगायचा.आज तो कार्यकर्ता हरवलाय.त्याचं महत्त्व संपवलंय…कारण आज मतं

कार्यकर्त्याच्या विश्वासाने नाही,

तर पैशाच्या गठ्ठ्याने मिळतात असा भ्रम काही जणांच्या डोक्यात भरलाय.

आज एका मताची किंमत २५ हजार ऐकून मन सुन्न होतं.

कारण जे विकत घेतलं जातं ते भावनेनं नव्हे, व्यवहारानं चालतं.

आणि व्यवहार सुरू झाला की प्रेम, नातं, पक्षाची ओळख, विचार…

सगळं मागे पडतं.मालवणमध्ये एका परिचितानं विचारलेला प्रश्न अजूनही कानात घुमतो—“काका, तिघांकडूनही पैसे मिळाले… आता मी काय करू?”

या एका वाक्यात भविष्यातील विध्वंस दडलेला आहे.एका बाजूला आमदार निलेश राणे जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन घेऊन जनतेशी बोलत होते…

तर मतदार मात्र ‘उपकार कुणाचे फेडायचे?’ या व्यवहारात अडकला होता.

यातूनच जिल्ह्याचा भविष्यकाळ विकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आज तर अळंबी सारखे अचानक उगवलेले कार्यकर्ते फक्त पैशावर पदाधिकारी बनतात.मीडिया त्यांना पैशामुळे डोक्यावर घेतो… आणि विचार, नीतिमत्ता, संघर्ष—

हे शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत.आज एक कटू प्रश्न समोर उभा आहे—कोकणच्या लाल मातीचं राजकारण संपलं आहे का?ज्या लाल मातीला देशाचे पंतप्रधानही सलाम करत होते…ज्यांनी मुख्यमंत्री,मंत्री,वक्ते, समाजसुधारक दिले…त्या परंपरेला आपण काही लाख रुपयांच्या बदल्यात विकणार आहोत का?पैशाचा हा महापूर एवढा प्रचंड झाला कीज्या नारायणराव राणे साहेबांच्या ताकदीवर 1990 ते 2024 पर्यंत एकही निवडणूक त्यांच्या प्रभावाशिवाय झाली नाही,

तसे राणेसाहेब स्वतःच या घाणेरड्या खेळापासून दूर गेले.हा आपल्या मतदारसंघाचा, आपल्या जिल्ह्याचा, आणि आपल्या राजकीय संस्कृतीचा सर्वात मोठा तोटा होय.

पण या अंधारातही एक प्रकाश आहे —आमदार निलेश राणे.

ज्यांनी पैशाच्या राजकारणासमोर छाती ताणून उभं राहण्याचं धाडस दाखवलं.ज्यांनी व्यवहाराच्या विरुद्ध विचाराचं युद्ध पुन्हा पेटवलं.

आणि ज्यांच्यात आजही लाल मातीची अस्मिता धगधगत आहे.

मी तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता.

पण विश्वासाने सांगतो —या लाल मातीचं राजकारण,तिचा स्वाभिमान आणि तिची विचारसंपदाजर कोण वाचवू शकत असेल तर तेच विचार, तीच परंपरा आणि हेच धाडस.

ही भूमी विकण्याची नाही—

ही भूमी लढण्याची आहे.

विचारांनी.स्वाभिमानाने.सत्याने लढण्याची आहे एवढे मात्र निश्चित.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!