🛑माडखोल–तेरेखोल नदीपात्रातील गाळ उचल प्रकरण तापले.
*🛑माडखोल–तेरेखोल नदीपात्रातील गाळ उचल प्रकरण तापले.*
*🛑अनधिकृत वाहतूक? रॉयल्टी न भरता गोवा सीमेकडे ट्रक धावले – प्रशासनावर प्रश्नचिन्ह!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* माडखोल–तेरेखोल नदीपात्रातील 2023 ते 2025 दरम्यान केलेल्या गाळउचल कामात मोठा गैरव्यवहार उघडकीस आल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे.नदीपात्रातून काढलेला हजारो घनमीटर गाळ सांगेली–माडखोल सीमेजवळील नार्वेकर नामक व्यक्तीच्या खाजगी जागेत साठवण्यात आला असून या गाळाची रॉयल्टी न भरता गोवा दिशेने मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
रॉयल्टी न भरता ट्रक रवाना – महसूल खातं गप्प का?ग्रामस्थ राजकुमार लक्ष्मण राऊळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तहसील कार्यालय, पाटबंधारे विभाग, आंबडपाल येथील अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर 27/02/2023 रोजी गाळउचल सुरू झाली.गाळ माडखोल-सांगेली सीमेजवळील नार्वेकर यांच्या जमिनीत टाकण्यात आला.मात्र गाळाचे मोजमाप प्रलंबित असताना देखील या साठ्यातून रॉयल्टी जमा न करता बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे.
इतकेच नव्हे तर या ठिकाणी महसूल अधिकारी, पाटबंधारे विभाग व बांधकाम विभागाने पाहणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.या सर्वामुळे “प्रशासनाच्या छत्रछायेतच हा काळाबाजार सुरू आहे का?” असा थेट सवाल नागरिक करत आहेत.अनधिकृत गाळ डेपो जप्त करा – ग्रामस्थांचा इशारा राऊळ आणि ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,सांगेली–माडखोल व माध्योल–लांगेनी भागातील सर्व अनधिकृत गाळ साठे तात्काळ जप्त करावेत.
संबंधित ठेकेदार, वाहन मालक व गाळ माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.अन्यथा 6/10/2020 पासून ग्रामपंचायत सदस्यांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल.“गाळ माफियांच्या धमक्यांना जबाबदार महसूल विभाग”निवेदनात हेही नमूद केले आहे गाळप्रकरणात सहभागी असलेले तथाकथित गाळमाफिया धमक्या देत असून, काही अप्रिय घटना घडल्यास यासाठी पूर्णपणे महसूल विभाग जबाबदार राहील, असा आरोप करण्यात आला आहे.
*पुरावे तयार – मोठा घोटाळा उघडकीस येणार?*
ग्रामस्थांनी सांगितले आहे की गाळउचल परवानगी, मोजमाप, वाहतूक, रॉयल्टी आणि पाहणीचे सर्व पुरावे प्रशासनाला सादर केले जाणार असून, या मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

