🛑कठोर परिश्रम,सातत्य आणि शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली- सुमुख चव्हाण.
*🛑कठोर परिश्रम,सातत्य आणि शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली- सुमुख चव्हाण.*
*🛑दिव्य ज्योती प्रशालेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- ३०:-* विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी सर्व क्रीडा स्पर्धांत भाग घ्यावा,त्यामुळे त्यांना आपले कौशल्य कोणत्या खेळात आहे,हे समजेल.आपल्या गटासाठी खेळताना स्वतःचे शंभर टक्के द्या अन खेळा.जीवनात यशस्वी होण्यासाठी कठीण परिश्रमांसोबतच शिस्तही महत्त्वाची आहे.परिश्रमाला जर शिस्तीची जोड मिळाली तर यश तुमच्याच पदरी आहे.’ असे विचार यावेळी सुमुख चव्हाण यांनी बोलताना व्यक्त केले.दिव्य ज्योती प्रशालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवात ते बोलत होते.
शुक्रवार व शनिवार दिनांक 28 व 29 नोव्हेंबर रोजी दिव्य ज्योती प्रशालेचा सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सावंतवाडी येथील एन.आय.एस. प्रमाणित बॅडमिंटनचे प्रशिक्षक श्री सुमुख चव्हाण,प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन,मॅनेजर फादर लिजो आदी मान्यवर उपस्थित होते.प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी गटानुसार उत्कृष्टरीत्या संचलन सादर केले.मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि क्रीडा मशाल पेटवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी अनेक सांघिक आणि वैयक्तिक खेळात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि आपले कौशल्य दाखविले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी स्वरा सातार्डेकर हिने केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी राजीव कोलते याने केले. या दोन दिवशीय क्रीडा महोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, सांघिकता, शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास वाढवण्या सोबतच ‘खेळ हीच प्रगतीची गुरुकिल्ली ‘असा संदेशही दृढ केला.विद्यार्थ्यांचा उत्साह,शिक्षकांचे मार्गदर्शनआणि पालकांचा सहभाग यामुळे दिव्य ज्योती प्रशालेचा वार्षिक क्रीडा महोत्सव यशस्वी,संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

