आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 जबदरस्तीने विद्युत पोल उभारण्याचे काम ग्रामस्थांनी पाडले हाणून..

🛑 सोनुर्लीतील प्रकार ; शेतजमीचे नुकसान होणारी विद्युत लाईन नकोच

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२९:- ग्रामस्थांना विश्वासात न घेता तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून काम न करण्याची लेखी सूचना दिलेली असताना सोनुर्ली येथे वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराकडून जबरदस्तीने अकरा केव्ही विद्युत लाईनचे पोल टाकण्याचे काम ग्रामस्थांनी आज हाणून पडले, शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान करत कॉरी क्रेशरच्या फायद्यासाठी होणार हे काम आम्ही कदापिही होऊ देणार नाही असा इशारा सोनुर्लीतील ग्रामस्थांनी दिला आहे.

सोनुर्ली गावातून वेत्ये आणि इन्सुली या गावाच्या ठिकाणी होऊ घातलेल्या एका क्रशर काॅरीसाठी अकरा केव्ही विद्युत लाईन मंजूर आहे हे लाईन टाकण्यासाठी तेथील शेतकरी ग्रामस्थांनी सुरुवातीपासून विरोध दर्शवला आहे, सुरुवातीला या ठिकाणी काम करण्यासाठी आलेल्या संबंधित ठेकेदाराने वन विभागाची परवानगी न घेता झाडेही तोडली होती या शेतकऱ्यांची नुकसान झाले होते परंतु शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत संबंधित ठेकेदाराला समज दिली होती. तसेच शेतकऱ्यांना जमिनीचे नुकसान होणारे हे काम वीज वितरण कंपनीने करू नये असे लेखी पत्र वीज वितरण कंपनीला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात आले आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच हे काम केले जाईल असे वीज वितरण कडून कळवण्यात आले होते. परंतु असे असताना आज अचानक ग्रामस्थांना विश्वासात न घेता संबंधित वीज वितरणच्या ठेकेदाराने जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनीतून विद्युत लाईन ओढण्यासाठी पोल टाकण्याचे काम सुरू केले. हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात येतात त्याने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत हे काम बंद पाडले, उपसरपंच भरत गावकर यांनी घटनास्थळी पोलिसांना बोलावून घेतले, संबंधित ठेकेदाराकडून आम्हाला विविध वीज कंपनीकडून हे काम करण्यास सांगितले आहे असे उत्तर दिले मात्र आम्हाला आमच्या शेतीचे नुकसान करून तसेच गावाच्या फायद्यासाठी या विद्युत लाईन चा काहीच फायदा नसताना हे काम आम्ही कदापी करू देणार नाही असा पवित्रा उपस्थित ग्रामस्थांनी घेतला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांकडूनही संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच हे काम करा कोणतेही वादावादी नको अशी सूचना देण्यात आली.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!