कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑५ डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन, महामोर्चा.

*🛑५ डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन, महामोर्चा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴ओरोस, दि- २८:-* शिक्षकांच्या टीईटी सक्ती व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत ५ डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यभर शाळा बंद आंदोलन व महामोर्चा काढण्याचे नियोजन शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने केले असून सदर आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग सर्व ताकदीनिशी उतरणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी दिली.

शिक्षकांना केलेला टीईटी सक्तीचा निर्णय मागे घेतला जावा, तसेच इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक प्रलंबित असल्याने राज्यभर शाळा बंद आंदोलन व महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

प्राथमिक शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्याऐवजी राज्य शासनाने शिक्षकांच्या संरक्षणार्थ भूमिका घेऊन न्याय द्यावा. आरटीई अॅक्ट कलम २३ मध्ये टीईटीबाबत सुधारणा करण्यासह एनसीटीईच्या अधिसूचनेत दुरुस्ती होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा. टीईटी अनिवार्यतेच्या नावाखाली थांबविलेली पदोन्नती शीघ्र सुरू करावी. महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ व १९८४ अंतर्गत जुनी पेन्शन योजना लागू करावी. संच २०२४ तसेच कमी पटाच्या शाळा मान्यता शासन निर्णय १५ मार्च बंद करण्याचे धोरण शासनाने रद्द करावे व खेड्यापाड्यातील बालकांची शिक्षणाची होणारी हेळसांड थांबवावी. शिक्षण सेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावरच शिक्षक नियुक्ती करावी. सर्व विषय पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी. राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरू करावी. दैनंदिन अध्ययन अध्यापनात अडसर ठरणारी बीएलओ व ऑ नलाईन कामे शिक्षकांना देऊ नयेत. पूर्वाश्रमीच्या वस्तीशाळा शिक्षकांच्या सेवा प्रथम नियुक्तीपासून पेन्शनसह ग्राह्य धराव्यात. मुख्यालयी राहण्याची सक्ती शासन जोपर्यंत मुख्यालय बांधून देत नाही, तोपर्यंत करू नये. आश्रम शाळेतील कंत्राटी पदभरती रद्द करावी. सेवाविषयक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालय स्तरावर त्रैमासिक सभा घ्यावी.

अशा प्रलंबित समस्या असल्याने शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने पुकारलेल्या या राज्यव्यापी आंदोलनात शिक्षक समिती पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी जाहीर केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!