🛑एक व्हीडिओ कॉल.. १९ हजार खात्यातून कट.
*🛑एक व्हीडिओ कॉल.. १९ हजार खात्यातून कट.*
*🛑बँक केवायसीच्या नावाखाली भेडशीतील युवकाची फसवणूक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- २१:-* कोण आपल्या बुद्धिमत्तेचा कसा गैरवापर करील हे सांगता येत नाही. समोरच्याला लुबाडून पैसे कमाविण्याचे नवनवीन फंडे समोर येत आहेत. यात भर म्हणून व्हीडिओ कॉलिंग हा प्रकार समोर आला आहे.
साटेली-भेडशी येथे एका ठिकाणी एक गाडा उभारून आपला संसार चालविणारा हा युवकाच्या बैंक खात्यामध्ये साधारण एकोणीस हजार चौऱ्याऐंशी रुपये होते. सकाळच्यावेळी त्याला एक अनोळखी व्हीडिओ कॉल आला तो त्यांनी उचलला.समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने आपण बँकमधून बोलत असल्याचे सांगितले.
त्याने ग्राहकाचा अचूक आधारकार्ड क्रमांक सांगितला. बँक केवायसीसाठी खात्री केली, असल्याचे सांगितले.यावर सदर युवकाने कोणतेही उत्तर दिले नाही. समोरून फोन कट करण्यात आला.फोन कट झाल्यावर सदर युवक कामाला निघून गेला.त्यानंतर त्याच्या मोबाईलवर काही ओटीपी आलेले होते.काही वेळाने तो युवक गाड्यावर लागणारा माल खरेदीचे ऑनलाईन पेमेंट करत असताना पेमेंट होत नव्हते, म्हणून त्याने बॅलन्स चेक केल्यावर त्याला धक्काच बसला. एकोणीस हजार चौऱ्याऐंशी पैकी चौऱ्याऐशी रुपये शिल्लक राहिले होते. तो तात्काळ बँकेमध्ये गेला व त्यांना सगळा प्रकार सांगितला. त्यांनी ते अमुक डिपार्टमेंटचे काम त्यांना सांगा तसेच एक फॉर्म भरा असे सांगितले. सदर युवकाने आपली फसवणूक कशी झाली म्हणून एका अन्य बँकेत काम करणाऱ्या मित्राला विचारले असता फेस रिडींग, डोळे स्कॅन, फसवणूक झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

