🛑सावंतवाडी : “माझे शहर, माझी जबाबदारी” — अपक्ष.
*🛑सावंतवाडी : “माझे शहर, माझी जबाबदारी” — अपक्ष.*
*🛑नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ.अन्नपूर्णा कोरगावकर यांची विकासाभिमुख भूमिका.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२१:-* “नगराध्यक्षपदासाठी मी अपक्ष म्हणून उभी आहे. तिकीट न मिळाल्याची खंत नाही… माझे शहर माझ्या स्वप्नांचे आहे आणि त्याचा विकास हीच माझी ध्यास आहे.” — अशा ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण शब्दांत सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार व माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
*“युवक–महिलांसाठी काम करणे ही माझी प्राथमिकता”*
सौ. कोरगावकर म्हणाल्या,
“आज हजारो मुलं शिक्षणासाठी, रोजगारासाठी परजिल्हा—परराज्यात जात आहेत. पण रोजगार आपल्या शहरातच निर्माण व्हायला हवा.”
यासाठी कृषी सेवा केंद्र, अन्नपूर्णा टेक सोर्स आयटी कंपनी यांच्या माध्यमातून १२० हून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
युवकांसाठी १२ हजार रोजगार निर्माण करण्याचे ध्येय त्यांच्या मनात आहे.“स्किल डेव्हलपमेंट हा भविष्यातील मार्ग आहे. त्यामुळे युवक आणि महिला मला अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे त्या म्हणाल्या.
विकासाचे ठोस आराखडे : वीज, पाणी, बाजारपेठ, शहरसुविधा
सौ. कोरगावकर यांनी शहरासाठी प्राधान्याने राबवावयाच्या योजनांची रूपरेषाही मांडली —अंडरग्राऊंड वीज वाहिनी प्रकल्प बाजारपेठेचे आधुनिकीकरण
*पाणीपुरवठा समस्येचे कायमस्वरूपी निराकरण*
स्वच्छ, सुसंस्कृत आणि स्मार्ट सावंतवाडी शहर“भरघोस विकासनिधी शहरात आणण्याचा माझा मानस आहे. कामाचा अनुभव आहे. त्यामुळे सावंतवाडीचा विकास योग्य हातात सुरक्षित राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“मागेही अपक्ष म्हणून निवडून आले, भाजपला पाठिंबा दिला – आजही विकासाचीच वाट”सौ. कोरगावकर यांनी आठवण करून दिली की —मागे अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला,
*उपनगराध्यक्षा म्हणून प्रामाणिकपणे काम केले,*
पक्षाकडून ऑफर असतानाही निष्ठेने कार्यरत राहिल्या.“अन्याय झाला तर विसरायचे — हेच माझे संस्कार. मी मतदारांची सेवक आहे, आणि तशीच राहणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
१३ वर्षांची विनामूल्य सेवा – दोन रूग्णवाहिकांद्वारे हजारोंना मदत
आरोग्यसेवेतील त्यांच्या कार्यालाही नागरिकांनी दाद दिली आहे.
गेल्या १३ वर्षांपासून दोन रूग्णवाहिकांच्या माध्यमातून त्यांनी मोफत सेवा दिली असून,
“गोवा रुग्णालयांवर अवलंबून राहण्याची परिस्थिती बदलणार. सावंतवाडीत उत्तम रुग्णालय उभे राहावे यासाठी माझी धडपड सुरु आहे.”
*“माझे शहर मला आशीर्वाद देईल”*
मेणबत्ती चिन्हासाठी अर्ज केल्याचे सांगत त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला —“सर्वपक्षीय नागरिक माझ्या पाठीशी उभे आहेत. मी मैदानात आहे आणि विजय निश्चित आहे.”
पत्रकार परिषदेस त्यांच्या कन्या ऐश्वर्या कोरगावकर, चिरंजीव अखिलेश कोरगावकर, तसेच श्रीरंग आचार्य, व्यंकटेश शेट, विनिता नाटेकर यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या या विकासाभिमुख, तळमळीच्या आणि स्वच्छ राजकारणावर आधारित भूमिकेमुळे सावंतवाडीच्या निवडणुकीत नवे समीकरण घडणार हे स्पष्ट आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

