🛑ज्ञानदीप भडगाव येथे डॉ.महेश अभ्यंकर यांचे विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन संपन्न.
*🛑ज्ञानदीप भडगाव येथे डॉ.महेश अभ्यंकर यांचे विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन संपन्न.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि- १८:-* ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ज्ञानदीप विद्या संकुल भडगाव येथे विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क JEE, NEET, CET व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिबिर रविवारी सायंकाळी ज्ञानदीप भडगाव येथे संपन्न झाले.
या मार्गदर्शन शिबिरास प्रमुख मार्गदर्शक NEET/JEE यांसारख्या स्पर्धा परीक्षांचे समुपदेशक डॉ.महेश अभ्यंकर, संस्थेचे दीपक लढ्ढा विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी , विनोद बेंडखळे, भालचंद्र कांबळे संस्था सदस्य रूपल पाटणे, ज्ञानदीप मोरवंडे,बोरजचे प्राचार्य भरत मोरे, ज्ञानदीप फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुजित नगरे,संस्थेचे रजिस्टार सीतारामपंत जामकर, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे,पर्यवेक्षक संतोष भोसले,विभाग प्रमुख विठ्ठल सकुंडे,मारुती आडाव,सुनील यादव, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप मोहिते यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय मकरंद दाबके यांनी केला.कोकणातील इ. ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना JEE, NEET, CET व स्पर्धा परीक्षांचे नि:शुल्क मार्गदर्शन मिळावे व कोकणातील विद्यार्थी मनात कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने JEE, NEET, CET सारख्या काठीण्य पातळी असणाऱ्या परीक्षांना सामोरे जावेत यासाठी सदर नि:शुल्क मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.महेश अभ्यंकर यांनी आतापर्यंत १७०० हून अधिक वैद्यकीय व्याख्याने, दहावी ते बारावीच्या ५००० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालक याना विनामोबदला मार्गदर्शन,५० हून अधिक शोधनिबंध प्रथितयश वैद्यकीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध आहेत.विविध वैद्यकीय पुस्तके,वर्तमानपत्रे, मासिके यामध्ये त्यांचे लेख आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते ‘कोविड योद्धा २०२१’ पुरस्कार आणि मा. विधानसभा अध्यक्ष्यांच्या हस्ते ‘लोकमत चेंज मेकर्स २०२३’ पुरस्कार त्याचबरोबर ‘आनंदी गोपाळ जोशी पुरस्कार’, ‘टोपीवाला शाळा मानपत्र’, ‘हेल्थ अँड वेलनेस आइकॉन’, ‘राजहंस पुरस्कार’ ‘समाजभूषण पुरस्कार’ ‘सामाजिक गौरव पुरस्कार २०२२’, ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ व २०२५ ’ असे ५० हून अधिक पुरस्कार प्राप्त आहेत.या कार्यक्रमात JEE / NEET / MHT-CET परीक्षांच्या तयारीसंदर्भात तसेच Engineering, Medical आणि Pharmacy क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या मार्गदर्शन शिबिरातून इच्छुक विद्यार्थी आणि पालकांना भविष्यातील शिक्षण आणि करिअरविषयी योग्य दिशा मिळणार असल्याची त्यांना खात्री वाटते.विद्यार्थ्यांनी “मोठी स्वप्ने पाहावी, लवकर सुरवात करावी, सातत्य राखावे, M C Q ची उत्तम तयारी करावी, मेहनतीला प्रयोजनाची जोड द्यावी,आई-वडिलांची आणि शिक्षकांची सोबतीने मन सुदृढ ठेऊन आत्मविश्वासाने या मार्गदर्शनातून उत्कृष्ट यश संपादन करावे असे त्यांचे स्वप्न आहे, यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध व परिपूर्ण तयारी कशी करावी, स्वतः कसे प्रयत्न करावेत? याचे संपूर्ण मार्गदर्शन यावेळी डॉ. महेश अभ्यंकर यांनी केले. या शिबिराचा रत्नागिरी – रायगड, सिधुदुर्ग जिल्ह्यातील ७०० पेक्षा जास्त विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी लाभ घेतला. अशा प्रकारच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना भविष्यात निश्चितच चांगला फायदा होणार आहे.कार्यक्रमाचे आभार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे यांनी मानले. सदर उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ.रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर,भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी,संस्थापक सदस्य चंदन पाटणे,प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

