आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मांगेली येथील काॅलेज तरुणी समीक्षा गवसची आत्महत्या ; अचानक घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने खळबळ

🛑 दोडामार्ग पोलिसांसमोर प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-११:-

दोडामार्ग तालुक्यातील मांगेली फणसवाडी येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. येथील कु. समीक्षा सुनिल गवस (वय १८) या तरुणीने सोमवारी सायंकाळी उशिरा स्वतःच्या घरात छताच्या लोखंडी रॉडला साडीने गळफास लावून आत्महत्या केली.

काॅलेजमधून घरी परतल्यानंतर समीक्षा हिने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू आहेत. तीने आत्महत्येपूर्वी कोणाशी तरी मोबाईलवर संवाद साधल्याची चर्चा असून, तोच तिच्या निर्णयाचा कारणीभूत ठरला का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. समीक्षा हिच्या काका उमेश रामा गवस यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पाहणी करून आवश्यक पंचनामा केला. मंगळवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

कु. समीक्षा गवस ही भेडशी येथील न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. सोमवारी ती नियमितप्रमाणे कॉलेजला गेली होती. सायंकाळी परतताना ती तणावाखाली असल्याचे तिच्या ओळखीच्या काही जणांनी सांगितले. त्यामुळे तिच्या मोबाईल डिटेल्सची सखोल तपासणी करून घटनेमागचे खरे कारण उघड करावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!