🛑कृषीच्या परदेश अभ्यासदौरा अनुदानात दुपटीने वाढ.
*🛑कृषीच्या परदेश अभ्यासदौरा अनुदानात दुपटीने वाढ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ११:-* यंदाच्या वर्षी कृषी विभागाच्या परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी राज्यभरातील १७० शेतकऱ्यांची निवड झाली होती. मात्र, शासनाच्या केवळ एक लाख रुपये अनुदानाच्या तुलनेने या दौऱ्याचा एकूण खर्च तिप्पट चौपट झाल्याने सर्वच शेतकऱ्यांनी सहभागी होण्यास असमर्थता दर्शविली. यासंदर्भात आम्ही आवाज उठविल्याने शासनाने अलिकडेच अनुदानाची मर्यादा दुप्पट म्हणजे २ लाख रुपये केली आहे, अशी माहिती आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष गणपत तथा भाई चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्याच्या कृषी विभागामार्फत सन २०१२ पासून परदेशांतील शेती-बागायतींमधील विकसित आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभराज्यातील शेतकऱ्यांना व्हावा, या उद्देशाने ६ गटांमध्ये विविध शेतकरी परदेश अभ्यास दौऱ्याचे गेली १३ वर्षे आयोजन करण्यात येते. मात्र, त्यासाठी १ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात येत होते. त्यामध्ये एकूण होणाऱ्या खर्चाच्या निम्मे अनुदानंच देण्याची तरतूद होती.
यंदाच्या वर्षी ऑगस्टमध्ये ३६ जिल्ह्यांतून १७० शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड झाली होती. मात्र, या दौऱ्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीने ६ गटांतील दौऱ्यासाठी ३.५ लाख ते ४.२५ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले. परिणामी, या शेतकऱ्यांना स्वतःच्या पदरचे २.५ लाख ते ३.२५ लाख रुपये खर्च करणे अवघड असल्याने सर्वांनी या दौऱ्यात सहभागी होण्यास असमर्थता व्यक्त केली.
या दौऱ्यात निवड झालेले शेतकरी, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांमध्ये वस्तुस्थिती मांडून या अनुदानात दुपटीने वाढ करावी, अशी मागणी केली होती.
या वृताची दखल घेऊन राज्य कृषी विभागाने शासनाकडे या अनुदानात दुपटीने वाढ करावी, असा प्रस्ताव पाठवित्ता होता. १४ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार, या १३ वर्षांत वाढलेले विमान तिकीट, निवास, अन्य दर तसेच डॉलर, युरो विनिमय दरात झालेली वाढ आदी बाबींचा विचार करून हे अनुदान २ लाख रुपये करण्यात आल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
यंदाच्या वर्षी दोन गटांचा नियोजित खर्च २.८० लाख रुपये आहे. त्यामुळे त्यांना फक्त १.४० लाख रुपये अनुदान देय राहील.
अपवाद सोडले, तर बहुतांश शेतकरी वर्ग हा गरीब असतो. त्यामुळे तो गटांची निवड करताना कमी खर्चाच्या गटाची निवड करतो. तरी सर्वांना मंजूर असलेले २ लाख रुपयांचे अनुदान सरसकट देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

