आणखी

ठाकरे सेनेचे माजी तालुकाप्रमुख, माजी जि. प सदस्य मायकल डिसोजा यांचा उद्या भाजपामध्ये प्रवेश

 

माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच ठाकरे सेनेचे माजी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांचा भाजपमध्ये प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मायकल डिसोजा हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार की भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा सावंतवाडी तालुक्यात सुरू होत्या. त्यामुळे त्यांच्या राजकीय निर्णयाबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत त्यांच्या प्रवेशाचा निर्णय निश्चित झाल्याची माहिती मायकल डिसोजा यांनी स्वतः दिली.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सावंतवाडीतील विशाल परब यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या औचित्यावर मायकल डिसोजा यांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!