आणखी

सावंतवाडी पंचायत समितीचे निवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी राजन पटेकर यांचे निधन

 

 

ब्युरो न्यूज

 

सावंतवाडी : मळगाव येथील रहिवासी तथा सावंतवाडी पंचायत समितीचे निवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी राजन धोंडू पटेकर (६५,) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.

प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मळगाव येथील परिमल नाट्य मंडळाच्या माध्यमातून त्यांनी हौशी नाटकांमध्ये विविध भूमिका साकार केल्या होत्या. कला व क्रीडा क्षेत्रात त्यांचा वावर होता. एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची मळगाव तसेच परिसरात ओळख होती. सदैव हसतमुख व मनमिळाऊ अशा स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना, भाऊ, भावजय, पुतण्या असा मोठा परिवार आहे. अमेय उर्फ धनराज व गौरव पटेकर यांचे ते वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!