कोकणतील जैन संस्कृतीच्या प्राचीन संदर्भांना ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन तर्फे विशेष उपक्रम राबविण्यात येणार; राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.१८: कोकण विभागामध्ये चैन संस्कृतीचे प्राचीन संदर्भ मोठ्या प्रमाणात आढळून येतात या विभागातील जैन समाजाच्या शैक्षणिक आर्थिक व व्यावसायिक विकासासाठी ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन तर्फे विशेष उपक्रम राबविण्यात येतील अशी माहिती फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैन समाज पदाधिकारी यांनी भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. कोकण विभागात विविध प्रकारच्या उत्खननांमध्ये जैन संस्कृतीचे प्राचीन अवशेष जैन मूर्ती इत्यादी मिळत आहेत. या प्राचीन अवशेषांचे व मूर्तींचे योग्य प्रकारे जतन करण्यासाठीही फेडरेशन तर्फे विशेष प्रयत्न करण्यात येतील असेही ललित गांधी यांनी सांगितले.या वेळी त्यांना निवेदनही सादर करण्यात आले.
महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स च्या विशेष कार्यकारणी बैठक तोंडवळी बीच रिसॉर्ट याठिकाणी बुधवारी संपन्न झाली. त्यानिमित्ताने त्यांनी जैन बांधवाशी सुसंवाद साधला व समाजातील समस्या,अडचणी जाणून घेतल्या.
या चर्चेत, प्रामुख्याने जैन समाजाला शासनाच्या अल्पसंख्याक समितीवर अशासकीय सदस्य पदी प्रतिनिधित्व मिळावे.तसेच अन्य शासकीय समितीवर देखील संधी देण्यात यावी.राष्ट्रीयकृत बँक मार्फत अल्पसंख्यांक म्हणून कर्जप्रस्ताव मंजूर व्हावे पेंडूर येथील पुरातन ऐतिहासिक जैन मूर्ती संरक्षण, जतन व्हावे व हा परिसर विकसित व्हावा. त्याचबरोबर विद्यार्थी शिष्यवृत्ती या बाबतही चर्चा करण्यात आली .या सकारात्मक चर्चेत अखिल कोकण प्रदेश जैन समाज पदाधिकारी, ऑल इंडिया जैन मायनोरिटी फेडरेशन चे सदस्य दयानंद मांगले, प्रकाश (सुनील )त्रिभुवणे,श्रीकृष्ण(अमोल) साळवी यांनी सहभाग घेतला.
*या निमित्ताने आगामी काळात होणाऱ्या जनगनणेत सर्व जैन बांधवांनी आवर्जून आपला धर्माचा उल्लेख जैन असा करावा.असे आवाहनही समाज बांधवांना करून लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑल इंडिया जैन मायनोरिटी फेडरेशनचे कार्यालय सुरू करण्याचे सूतोवाच ललित गांधी यांच्याकडून करण्यात आले.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_