कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑राज्य हौशी नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर.

*🛑राज्य हौशी नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर.*

 

*🛑मालवण येथे होणार आठ नाटके.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०४:-* महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५-२६ ची प्राथमिक फेरी ६ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत मालवण केंद्रात मामा वरेरकर नाट्यगृहात होणार आहे. राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात होत आहे. सिंधुदुर्गातील नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गतवर्षी चार नाटके सादर झाली होती. यावेळी आठ नाटके सादर होणार आहेत. गुरुवार ६ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता ‘शनिवार रविवार’ (बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक सतीश आळेकर, दिग्दर्शक केदार सामंत आहेत. शनिवार ८ रोजी सायंकाळी ७वाजता ‘तुझ्यात जीव रंगला’ (साईकला क्रीडा मंच, पिंगुळी, कुडाळ) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक केदार देसाई आहेत. रविवार ९ रोजी सायंकाळी ७वाजता ‘अखेरचा सवाल’ (सातेरी प्रासादिक तरुण नाट्य कला क्रीडा मंडळ, कवठी) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक वसंत कानेटकर, दिग्दर्शक संतोष सांगळे आहेत. सोमवार १० रोजी सायंकाळी ७ वाजता ‘वाट चुकला देवा’ (श्री राधाकृष्ण मंदिर देवस्थान) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक किशोर तळवडकर, दिग्दर्शक नंदकुमार तळवडकर आहेत. बुधवार १२ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘बायको शिवाय काय खरा नाय’ (श्री साईं गणेश मित्रमंडळ कलमठ, कणकवली) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक विठ्ठल सावंत, दिग्दर्शक शेखर गवस आहेत. गुरुवार १३ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘जिथून पडल्या गाठी’ (स्वराध्या फाउंडेशन, मालवण) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक संकेत तांडेल, दिग्दर्शक हेमंत कदम आहेत. शुक्रवार १४ रोजी सायंकाळी ७वाजता ‘संदूक’ (युथ फोरम, देवगड) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक अनिरुद्ध नारिग्रकर, दिग्दर्शक विजय कदम आहेत. शनिवार १५ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘साठा उत्तरांची कहाणी’ (वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक विक्रम भागवत, दिग्दर्शक रघुनाथ कदम आहेत. सर्व नाट्यप्रेमींनी नाटकांचा लाभ घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभिषण चवरे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!