🛑मोबाईल टॉवरच्या केबल चोरी प्रकरणी संशयित ताब्यात.
*🛑मोबाईल टॉवरच्या केबल चोरी प्रकरणी संशयित ताब्यात.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि- ०३:-* उंबर्डे व मांगवली येथील मोबाईल टॉवरच्या केबल चोरीप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी एकाला पुणे येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीत वापरण्यात आलेला टेम्पोही ताब्यात घेण्यात आला आहे. प्रथमेश राजकुमार शिंदे (वय २० वर्ष, रा. कर्नाटक. सध्या रा. पुणे) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
मोबाईल टॉवरची केबल व अन्य साहित्य असा ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या केबल चोरीप्रकरणी बिफोर्स सोल्युशन प्रा.लि. कंपनीचे फिल्ड ऑफिसर सुहास दत्ताराम चव्हाण यांनी १० ऑक्टोबर, २०२५ रोजी वैभववाडी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती.
वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे भुतेवाडी व मांगवली बौद्धवाडी येथे खासगी कंपनीचे मोबाईल टॉवर आहेत. येथील अॅल्युमिनियम धातूची केबल व इतर साहित्य असे सुमारे ५० हजार रु. किंमतीचे साहित्य २१ सप्टेंबर, २०२५ रोजी चोरीस गेले होते. याबाबत बिफोर्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फील्ड ऑफिसर सुहास दत्ताराम चव्हाण यांनी वैभववाडी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती. वैभववाडी पोलिसांनी सखोल चौकशी केली असता टेम्पो क्र.एम.एच १२ एन. एक्स. ९११५ या टेम्पोतून साहित्य घेऊन जात असताना हा टेम्पो एका ठिकाणी रुतला होता. तो बाहेर काढण्यासाठी एका स्थानिक ट्रॅक्टरवाल्याने त्याला मदत केली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हा टेम्पोचालक पुणे येथील असल्याचे समजले. वैभववाडी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत सावंत, किरण मेते, हरीश जायभाय यांच्या पथकाने पुणे येथे जात हा टेम्पो व टेम्पो चालक प्रथमेश शिंदे याला ताब्यात घेऊन वैभववाडी पोलीस ठाणे येथे आणण्यात आले.
रविवारी त्याला कणकवली न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन पाटील करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

