कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत उद्या शक्तिपीठ महामार्गविरोधी परिषद.

*🛑सावंतवाडीत उद्या शक्तिपीठ महामार्गविरोधी परिषद.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* गेली वीस-पंचवीस वर्षे श्रमिक मुक्ती दल आणि सत्यशोधक जनआंदोलनाच्या नेतृत्वाखालील सिंधुदुर्ग जिल्ह्यात गवळी धनगर, बेरड, कातकरी, धरणग्रस्त, कुणबी मराठा समाजाचे अनेक लढे चालू आहेत. तिलारी कुर्ली घोणसरी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, बेरड, कातकरी, गवळी धनगरांच्या वन जमिनी असे सर्व लढे आतापर्यंत सगळ्यांनी नेटाने लढवले आहेत. मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी येथे शमशुद्दीन काझी हॉल येथे होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गविरोधी परिषदेत या चळवळीतील स्त्री-पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही परिषद यशस्वी करावी, असे आवाहन श्रमिक मुक्तीदलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई आणि सत्यशोधकचे राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.

चौकुळ-आंबोली परिसरातील गवळी धनगर, बेरड, महादेवाचे केरवडे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जमिनी वन विभागाकडे संरक्षित वने म्हणून वर्ग करण्याच्या विरोधातील लढाई, स्मार्ट मीटरविरोधी संघर्ष, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा संघर्ष, कातकरी आदिवासींच्या वनहक्काचा संघर्ष ज्या ताकदीने लढवला आहे, त्याच ताकदीने या शक्तीपीठविरोधी लढ्यात उतरण्याचा निर्णय या सर्व चळवळीनी घेतला आहे. आजरा तालुक्यातून सिंधुदुर्गात येणारा शक्तीपीठ महामार्ग गेळे आंबोली ते घारपी उदेलीतून असनिये, तांबोळीमार्गे डेगवे, बांदा असा प्रस्तावित आहे. या मार्गातील शेतकऱ्यांच्या जमिनी, आंब्या-फणसाच्या बागांबरोबर येथील पर्यावरण आणि निसर्गही उद्धवस्त होणार आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेला हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील बनला आहे. असे असताना येथून शक्तीपीठ महामार्ग करणे म्हणजे पश्चिम घाटाच्या मुळावरच उठण्यासारखे आहे. संपूर्ण कोकणालाच याचा फटका बसणार आहे. या लढाईत मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. ही लढाई केवळ शेतकऱ्यांची नसून येथील जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी, साहित्यिक, कवी, लेखक अशा सर्व बुद्धीजीवींनीही सहभाग द्यावा, असेही आवाहन केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!