आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत गावकऱ्यांचा इशारा ; बाहेरचा उमेदवार नकोच

🛑 गाव पंचक्रोशीचा अपमान सहन केला जाणार नाही ; कार्यकर्त्यांची झणझणीत बैठक; पक्ष नेतृत्वालाच धक्का

📰 निवडणूक विशेष वृत्त

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०२:-* येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वालाच थेट इशारा दिला आहे “गाव पंचक्रोशीच्या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार नकोच, अन्यथा मतदार मतदानाच्या वेळी धडा शिकवतील!”

तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत हा ठराव एकमुखाने मंजूर झाला. जवळपास चार मतदारसंघांतील सुमारे ५० प्रमुख कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले होते.

पक्षाचे आम्ही गुलाम नही ; कार्यकर्त्यांचा संताप

या बैठकीत कार्यकर्त्यांचा रोष उफाळून आला. “पक्षासाठी वर्षानुवर्षे आम्ही राबतो. निवडणुकीच्या वेळी मात्र बाहेरचा उमेदवार लादला जातो. आता हे सहन होणार नाही! आम्ही मतदार आहोत, नोकर नाही!”असे ठणकावून सांगत कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाला डोळे उघडण्याचा इशारा दिला.बैठकीत हेही ठरविण्यात आले काही पक्ष आपल्या गाव नेत्यांना खूश ठेवण्यासाठी किंवा त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी परगावी राहणाऱ्या उमेदवारांना मतदारसंघात लादतात, पण यावेळी मतदार ते स्वीकारणार नाहीत.

“शहरात राहून गाव चालवणारे नकोत”

गावातील ग्रामस्थांनी जाहीर केले की, जे उमेदवार गावात राहत नाहीत, परराज्यात नोकरी करतात किंवा शहरात स्थायिक झाले आहेत आणि केवळ निवडणुकीच्या वेळी गावात येतात, अशांना मतदान करायचे नाही. “ग्रामस्थांना दाखले, सही, योजनांसाठी शहरात धाव घ्यावी लागते. असा कारभार आता थांबवायचा आहे. गावच्या सुख-दुःखाशी देणेघेणे नसलेला उमेदवार आम्हाला नको!”असा ठाम संदेश गावकऱ्यांनी दिला.

“स्थानिकांना संधी, बाहेरच्यांना नकार”

गावकऱ्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही स्थानिक कार्यकर्त्यांसाठीच संधी असल्याचे अधोरेखित केले. बाहेरचे उमेदवार लादले गेले, तर संपूर्ण गाव एकवटून त्याला विरोध करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी ठरवले की, बाहेरील‌ उमेदवारांविरोधात जनजागृती मोहीम सुरू केली जाईल. प्रत्येक मतदारसंघात “गावाचा सन्मान, स्थानिकांचा अधिकार” या नावाने अभियान राबवले जाणार आहे.

स्थानिकांचा निर्णय — आदर्शवत, पण पक्षांसाठी धोक्याची घंटा!

गावकऱ्यांचा हा ठराव एकप्रकारे आदर्शवत आणि लोकशाहीला बळ देणारा ठरतो आहे. मात्र राजकीय पक्षांसाठी हा इशारा धोक्याची घंटा ठरू शकतो. कारण, या निर्णयामुळे “वरून उमेदवार ठरवणारे” पक्ष नेते आता मतदारांच्या रागाचा सामना करावा लागणार आहे.एकंदरीत, सावंतवाडी तालुक्यात सुरू झालेली ही “स्थानिक उमेदवार चळवळ” पुढील काही दिवसांत संपूर्ण जिल्ह्याचा राजकीय पट बदलू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!