🛑 ओटवणेत उद्या प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराजांची पुण्यतिथी
🛑 समाधी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा ; ट्रस्टचे आवाहन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴ओटवणे, दि-०१:– ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १२ व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त रविवार २ नोव्हेंबर रोजी समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज माणगाव येथील वैकुंठवासी प पू परिवज्रकाचार्य श्री परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांच्या थोर गुरुपरंपरेतील वैद्यराज परमपूज्य बाबा महाराज मानवतकर महाराज यांचे पट्ट शिष्य होते. कुडाळकर महाराज यांच्या पुणे गोखलेनगर येथील श्री दत्त सदनात गेल्या ५७ वर्षांपासून श्री गुरुचरित्र अखंड पारायण सप्ताह, श्री दत्त जयंती, श्री दत्त याग, गुरुपौर्णिमा आदी कार्यक्रम अखंडपणे सुरू आहेत. गुरुकृपेने त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून हजारो रोगी बरे करताना असंख्य लोकांना व्यसनमुक्त करून त्यांच्या कुटुंबांचे कल्याण केले. त्यांचे देशभरासह जर्मनी, अमेरिका, युरोप, मॉरीशिअस आदी परदेशात हजारो प्रचंड शिष्यवर्ग आहे.
यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ९ वाजता सर्व देवतांचे पूजन, सकाळी १० वाजता प पू प्रेमानंद स्वामी महाराजांच्या मूर्तीला महाअभिषेक, सकाळी ११ ते वाजता पिंपरी संत तुकारामनगर येथील श्री गुरुदत्त प्रासादिक भजनी मंडळाचे सुश्राव्य वारकरी सांप्रदायी भजन ह.भ.प. श्री. अशोक महाराज गुरव, श्री गोरक्षनाथ महाराज टाव्हरे व ह. भ. प. चंद्रकांत महाराज घोडे हे सादर करणार आहेत. दुपारी १२:३० वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता वारकरी सांप्रदायिक हरीपाठ, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ८ वाजता ह. भ. प. टाव्हरे महाराज (मंचर) यांचे वारकरी सांप्रदायिक किर्तन होणार असून संगीत साथ पिंपरी पुणे येथील श्री गुरुदत्त प्रासादिक भजनी मंडळाची आहे. ओटवणे कापईवाडी येथील श्री गणेश प्रासादिक भजनी मंडळाचाही यात सहभाग आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अँड सुरेंद्र मळगावकर आणि डॉ अनिकेत कुडाळकर यांनी केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

