कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑साळीस्तेतील हाय प्रोफाईल खून प्रकरणात कणकवली पोलिसांचा मोठा धडाका.

*🛑साळीस्तेतील हाय प्रोफाईल खून प्रकरणात कणकवली पोलिसांचा मोठा धडाका.*

 

*🛑बेंगलोरहून तीन आरोपी ताब्यात; प्रॉपर्टी वादातूनच खुनाचा थरार उघडकीस येण्याची शक्यता!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २८:-* साळीस्ते येथे सापडलेल्या श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर – कर्नाटक) यांच्या खून प्रकरणाचा थरार अखेर उलगडू लागला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि कणकवली पोलिसांच्या संयुक्त पथकाने बेंगलोर गाठून सोमवारी रात्री तब्बल तीन संशयितांना ताब्यात घेतले. या तिघांना घेऊन पथक कणकवलीकडे रवाना झाले असून, आज (मंगळवार) सायंकाळपर्यंत ते कणकवलीत पोहोचतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ही ‘मर्डर केस’ आता हाय प्रोफाईल बनली असून, आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिस वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

चार दिवसांपूर्वी महामार्गालगत साळीस्ते येथे गणपती सान्याच्या पायरीवर श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह आढळला होता. त्याच दिवशी रेड्डी यांच्या आईच्या नावे असलेली कार दोडामार्ग परिसरात सापडली. कारमध्ये रक्ताचे डाग आढळल्याने ही दोन्ही प्रकरणे परस्परांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.या धागेदोऱ्यांवरून एलसीबी आणि कणकवली पोलिसांनी बेंगलोर गाठले आणि तीन दिवसांच्या गुप्त तपासानंतर सोमवारी रात्री संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून ‘प्रॉपर्टी वादातूनच खुनाचा डाव आखला गेला’ असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रेड्डी यांचा खून साळीस्ते परिसरातच करण्यात आला असावा, त्यानंतर मृतदेह त्याच ठिकाणी फेकून आरोपींनी त्यांची कार दोडामार्ग येथे सोडून दिली व पसार झाले, अशी प्राथमिक माहिती तपासातून पुढे आली आहे.

एलसीबीचे अधिकारी आणि कणकवली पोलिस आता आरोपींकडून चौकशी सुरू करणार असून, पुढील काही तासांत या खुनामागील खरे कारण आणि मुख्य सूत्रधार उघडकीस येण्याची शक्यता आहे.सिंधुदुर्ग पोलिसांनी या तपासात दाखवलेली तत्परता आणि वेगवान कारवाई सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!