आणखीमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

🛑 मोंथा चक्रीवादळाचा दणका! पुढचे ‘इतके’ दिवस पाऊस घालणार धुमाकूळ, मुंबईसह ‘या’ ठिकाणी धो धो बरसणार

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-२६:- दक्षिण भारतात ‘मोंथा’ चक्रीवादळा धडकलं असून मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.यामुळे मुंबई, मुंबई उपनगर आणि कोकणच्या विविध ठिकाणी पुढचे दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान, 75 टक्के परिसरात फेयरली वाईड स्प्रे म्हणजेच 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मच्छीमारांनी खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

 

हवामान विभागाच्या माहितीनुसार, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारी दुपारनंतर मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे हलक्या सरी कोसळल्या. तर ग्रेटर मुंबईच्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ परिसरातही पाऊस पडला. अनेक ठिकाणी दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारासही पाऊस पडला. काही ठिकाणी शाळांनी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आज रविवारीही मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे मुंबईत संध्याकाळी काही भागात दमदार पाऊस पडला.

बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे येत्या २४ तासात तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होईल. तर हे चक्रीवादळ मंगळवारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.या चक्रीवादळामुळे मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.

 

सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा मुंबईपासून ४५० किमी अंतरावर आहे. त्याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कमी दाबाचं क्षेत्र दूर असले तरी सोमवारी उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरातच्या दिशेनं सरकण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवर बुधवार ते गुरुवारपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा, मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश, विदर्भात मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर दुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!