🛑 तेजस्विनी आचरेकर यांची बेंगळुरू,कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर तायक्वॉंदो स्पर्धा करीता पंच म्हणून निवड
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴लांजा, दि-२६:- 42 वी राष्ट्रीय ज्युनियर क्युरोगी व 11 वी पूमसे तायक्वॉंदो चॅम्पियनशिप स्पर्धा कोरमंगला इनडोअर स्टेडियम,बेंगळुरू,कर्नाटक येथे दिनांक ३१ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धा करिता लांजा तालुक्यातील तायक्वॉंदो या खेळाच्या राष्ट्रीय पंच तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे.
तेजस्विनी ह्या मंदरुळ गावच्या कन्या असून त्या सद्या लांजा तालुका येथे वास्तव्यास असून तायक्वॉंदो या खेळाच्या प्रमुख प्रशिक्षिका आहेत त्यांनी लांजा तालुक्यातील विविध ग्रामीण भागात,तसेच लांजा शहरातील गोंडे सखल रोड चॉकलेट ड्रॉप,एकनाथ राणे स्कूल,डी.जे सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल, सेंटआणे विद्यानिकेतन स्कूल देवधे या सर्व शाळांमध्ये तायक्वॉंदो या खेळाचा तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा च्या अंतर्गत चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत तसेच त्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे स्वयंसिद्धा प्रशिक्षिका ही आहेत त्या अंतर्गत त्या नेहमी महिला व मुलींना स्वतःचे स्वसंरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देत असतात,तसेच त्या स्वतः राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्तरावर त्यांनी अनेक पदके मिळवली आहेत,याआदी त्यांना सामाजिक शेत्रात व क्रीडा शेत्रात उल्लेखनीय कार्यास खूप सारे पुरस्कार ही त्यांना मिळालेले आहेत.
त्यांच्यायाचं कार्याची दखल घेत त्यांची तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर पंच म्हणून निवड केली आली आहे.
तसेच त्यांना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, सेक्रेटरी मिलिंद पठारे, उपाध्यक्ष प्रविण बोरसे, उपाध्यक्ष धुळीचंद मेश्राम खजिनदार व्यंकटेशराव करृरा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करृरा, कोषाध्यक्ष शशांक घडशी,लांजा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सिराज नेवरेकर,तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा चे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडिज, सहसचिव अनुजा कांबळे, कोषाध्यक्ष तेजस पावसकर,सदस्य रोहित कांबळे, लांजा नगरपंचायत नगर सेवक संजय यादव,
कोर्ले ग्रामपंचायत सरपंच गणेशराव साळुंके,ग्रामसेवक तेजस वडवलकर,मंदरुळ गावचे गावप्रमुख परशुराम मासये व समस्त लांजा-राजापूरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

