कृषिकोकणवेंगुर्लेसिंधुदुर्ग

*पर्यटनातचं रोजगाराच्या मोठ्या संधी….श्री सारंग ओक*

*पर्यटनातचं रोजगाराच्या मोठ्या संधी….श्री सारंग ओक*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*त्रिविक्रम सावंत*

*🎴 वेंगुर्ला*
अवघ्या कोकणाला निसर्गाने भरभरून दिलेलं आहे आणि त्याला आपला सिंधुदुर्गही अपवाद नाही. येथील मस्यसंपदा,आकर्षक समुद्र किनारे,हिरवेगार डो़गर,कोकणी मेवा,जैवविविधता आणि इथली संस्कृती आणि परंपराही देशातीलच नव्हे तर साऱ्या जगातील पर्यटकांना आकर्षित करते.अशा निसर्ग संपन्न सिंधुदुर्गात पर्यटन हा प्रमुख व्यवसाय होवू शकतो ज्यामध्ये अनेक रोजगाराच्या संधी दडलेल्या आहेत.त्यासाठी सर्वानी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन पुणे येथील अनुनाद या संस्थेचे आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक श्री सारंग ओक यांनी केले.
वेंगुर्ला तालुक्याची व्यवसायिक पर्यटन महासंघाच्या बैठकीत ते बोलत होते. सुरूवातीला या बैठकीचे समन्वयकश्री प्रसन्ना देसाई यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा महासंघाचे सचीव अँड नकुल पार्सेकर यानीं उपस्थित पर्यटन व्यवसायिकांना मार्गदर्शन केले.सिंधुदुर्ग जिल्हा प.व्य.महासंघाचे अध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी महासंघ स्थापनेची भूमिका स्पष्ट केली.कार्याध्यक्ष श्री सतीश पाटणकर यांनी महासंघाची ध्येय व धोरणे याबाबत सविस्तर विवेचन केले.
वेंगुर्ला तालुक्यातील उपस्थित पर्यटन व्यवसायिकांना आपल्या समस्या मांडल्या .या बैठकीला श्री जीतेंद्र पंडित,श्री दिनानाथ बांदेकर, कमलेश चव्हाण, विनोद रेडकर,जगन्नाथ डोंगरे,दिनानाथ वेर्णेकर, प्रशांत खानोलकर,बाबली वायंगणकर, सेलेस्तीन फर्नांडिस, पुरुषोत्तम परब,सौ.श्वेता हुले,शेखर सामंत,दादु केळूस्कर,शैलैश शिरसाट, गणपत केळुसकर, प्रकाश मोटे,साची फणसेकर,महेश सामंत,पुणे अनुनादच्या सौ.पुजा खांडेकर आदि उपस्थित होते.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!