🛑 लेखणीची ज्योत आणि नेतृत्वाचा दीप, कोकणच्या आशेचा प्रकाश
🛑 सत्यासाठी निर्भीड आवाज आणि जनतेसाठी जिवाची बाजी लावणारे नेतृत्व
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ उपसंपादक: प्रतिक राणे
🎴 सिंधुदुर्ग, दि-२५ :– कोकणाची माती केवळ निसर्गसौंदर्यासाठी ओळखली जात नाही, तर ती जिद्दी, प्रामाणिक आणि निडर लोकांसाठीही परिचित आहे. सत्यासाठी उभं राहणं आणि समाजहितासाठी लढणं ही परंपरा आजही काही व्यक्तींमुळे जिवंत आहे. अशा दोन जिगरी, धैर्यवान आणि समाजहितासाठी समर्पित व्यक्ती म्हणजे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूजचे संपादक सीताराम गावडे आणि कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार तसेच माजी खासदार निलेश राणे.
गावडे यांनी अमली पदार्थ, चरस, गांजा आणि समाजघातक अन्य उपक्रमांविरुद्ध सातत्याने लेखणीचा आवाज उठवला आहे. अनेक वेळा त्यांच्यावर हल्ले झाले, दबाव आणला गेला, परंतु त्यांनी कधीच सत्याची बाजू सोडली नाही. त्यांच्या लेखणीची ताकद केवळ बातमी लिहिण्यापुरती मर्यादित नाही; ती समाजाला दिशा दाखवते, अंधकारात उजेड आणते.
या संघर्षात नेहमीच खंबीर उभे राहिलेले आहेत आमदार निलेश राणे. समाजातील प्रश्न, कलाकारांचे हक्क, धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचा सन्मान राणे हे नाव नेहमी पुढे दिसते. अलीकडेच त्यांनी दशावतार कलाकारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनदरबारी पाठपुरावा करून “दशावताराचे कैवारी” ही उपाधी मिळवली. बिबवणे येथे पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्या बैठकीत राणे यांचा सन्मान करण्यात आला. अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या कलाकारांना शासनमान्यता आणि अनुदान मिळवून देण्यासाठी त्यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या सहकार्याने पुढाकार घेतला. त्यामुळे कोकणातील कलाकारांचे हक्क आता खऱ्या अर्थाने सुरक्षित झाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभेतही राणे यांनी ठामपणे जनतेचा आवाज मांडला: “महाराष्ट्रात गोहत्या थांबली पाहिजे, गोमातेचे रक्षण केले पाहिजे, जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे,” असा त्यांचा ठाम आग्रह. त्याचबरोबर कोकणातील शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या रानटी जनावरांच्या प्रश्नावरही त्यांनी जनहिताचा संदेश दिला: “फक्त बांबू लागवड करा म्हणून सांगण्यापेक्षा, त्या लागवडीचं रक्षण करा.”
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेचा प्रभाव तळागाळापर्यंत पोहचवला आहे. तेथील लोक म्हणतात, “असा नेता आंम्हाला मिळाला हे आमचं भाग्य आहे.” त्यांच्या कार्याने आणि विचारांनी प्रेरित होऊन मोठ्या प्रमाणावर लोक शिंदे शिवसेनेत प्रवेश करताना दिसतात.
गावडे यांच्या निर्भीड लेखणीने समाजातील अंधार उजेडात आणला, आणि राणे यांच्या नेतृत्वाने त्या प्रश्नांना प्रत्यक्ष उपाय दिला. ही जोडी म्हणजे धैर्य आणि कृतीची सांगड. एका बाजूला गावडे सत्यासाठी लढतात, तर दुसऱ्या बाजूला राणे विकासासाठी झटतात. दोघांचं ध्येय एकच कोकण नशामुक्त, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि विकासाच्या मार्गावर नेणं.
आज जेव्हा अनेक जण मौन बाळगतात, तेव्हा गावडे यांच्या लेखणीतून शब्द जळतात आणि राणे यांच्या कृतीतून परिवर्तन घडतं. ही जोडी म्हणजे कोकणच्या आशेचा किरण “सत्यासाठी निर्भीड आवाज आणि जनतेसाठी जिवाची बाजी लावणारे नेतृत्व.” कोकणला अभिमान वाटावा अशी ही जोडी – सीताराम गावडे आणि निलेश राणे ; सत्याची शपथ आणि विकासाची दिशा!
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

