आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 “ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव!” ; महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भडका

🛑 विमा रकमेच्या थकबाकीविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन; दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई न मिळाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-०९:- वारंवार मागणी करूनही जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांना फळपिक विम्याची नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे. राज्यातील महायुती सरकार, कृषिमंत्री, पालकमंत्री आणि भारतीय कृषी विमा कंपनी यांनी शेतकऱ्यांची उघड फसवणूक केल्याचा आरोप करत आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने ‘ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव’ धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, आंबा-काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, तसेच शेतकरी प्रतिनिधी व्ही. के. सावंत व विजय प्रभू यांनी केले.

दरम्यान, आंदोलनादरम्यान परिसर घोषणांनी दणाणून गेला —

“शेतकऱ्यांना फळपिक विम्याची रक्कम मिळालीच पाहिजे!”,

“कृषी मंत्र्यांचा निषेध असो!”,

“पैसे आमच्या हक्काचे — कोणाच्या बापाचे नाही!”

अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

परिसतरात महायुती सरकारचा निषेध करणारे फलक झळकले, तर आंदोलनात शेकडो शेतकरी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रतिनिधींनी दिवाळीपूर्वी विमा रक्कम देण्याची मागणी केली. अन्यथा जिल्हाभर उग्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा आघाडीच्या नेत्यांनी दिला.

आंदोलनात शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, सुशांत नाईक, तसेच राजन नाईक, बबन बोभाटे, अभय शिरसाट, कन्हैया पारकर, बंडू ठाकूर, नंदू शिंदे, संजय गवस, मायकल डिसोझा, बाळू परब, अनंत पिळणकर यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!