आणखीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

“सह्याद्रीचा पट्टा म्हणजे भारताचे अमेझोन” ; प्राणी मित्र अमृतसिंह

🛑 वन्यजीव सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात कार्यशाळा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०९:- सह्याद्रीच्या पट्ट्यात वनस्पती, प्राणी,पक्षी,सूक्ष्मजीवाणू, किटाणू, फुलपाखरे, यांची प्रचंड विविधता असल्याने हा प्रदेश समृद्ध आहे. त्यामुळे देशभरातील अभ्यासक या प्रदेशाला भारताचे अमेझोन म्हणतात. म्हणून या प्रदेशातील जैवविविधता जोपासणे हे आपले कर्तव्य आहे. असे प्रतिपादन गोव्यातील प्राणी मित्र अमृतसिहं यांनी केले. वन्यजीव सप्ताहा निमित्त दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात एक दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर, वनरक्षक शैलेश कांबळे,उमेश राणे,अजित कोळेकर,सुशांत कांबळे, शुभम वारके,वनसेवक विश्राम कुबल, चंद्रहंस करपे, सर्पमित्र प्रकाश नाईक,बाबू वरक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत हे उपस्थित होते.

अमृतसिंह हे सापाचे अभ्यासक असल्याने सापाविषयी माहिती देताना ते म्हणाले की साप दूध पीत नाही. त्यांच्या अंगावर केस नसतात, रात्री शीळ घातल्याने साप घरात येत नाहीत.नागाच्या फण्यावर नागमणी नसतात.साप हवेत उडत नाहीत. डोक्यावर चावत नाहीत.पुंगी वाल्याच्या पुंगीवर किंवा गाण्यावर डोलत नाहीत. या सर्व भकडं कथा आणि अंधश्रद्धा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये.

सर्पदंश झाल्यावर हाता पायाला बांधू नये. त्यावर जखमा करू नये. पाणी प्यायला देऊ नये.तोंडाने विष शोषण करू नये.ते चित्रपटात दाखवतात पण ते सत्य नसते. गावठी औषध मांत्रिक तांत्रिक आणि खाजगी रुग्णालयात न जाता तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करावे.सर्पदंशामुळे चेतासंस्थेवर फरक पडतो. रक्ताभिसरण प्रक्रिया मंदावते.घशाला कोरड पडते.काही वेळा तोंडाला फेस येतो.त्यामुळे तात्काळ दवाखान्यात जाणे आपल्या आरोग्याच्या हिताचे असते असे प्रतिपादन त्यांनी केले.

आपल्याकडे फक्त नाग,घोणस, मण्यार,फुरसे,नागराज हेच विषारी साप असून बाकी सर्व बिनविषारी आहेत. तरीही आपल्या खबरदारीसाठी दवाखान्यात जाणे हिताचे असते असे सांगितले.

यावेळी सह्याद्रीच्या परिसरातील वन्य जीवाची माहिती वनरक्षक शुभम वारके यांनी दिली. तर अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष सावंत म्हणाले की, सह्याद्रीच्या पट्ट्यात प्रचंड जैवविविध आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना झाली पाहिजे.त्यांनी त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. तरच आपण आणि आपल्या पुढच्या पिढ्या सुखाने जगू. अन्यथा भविष्यात आपनास स्वच्छ हवा पाणी मिळणार नाही. चढनीचे मासे मिळणार नाहीत.याचे रक्षण आपणच केले पाहिजे.

भूगोल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. पी.डी गाथाडे यांनी केले तर उपस्थित यांचे आभार कुमारी प्रीती जाधव हिने मांनले.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!