कृषिशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

तळवडे येथे शेतकरी प्रशिक्षण माती परीक्षण व कृषी दिन कार्यक्रम संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१५: “शेतकऱ्यांनी स्वतःबरोबरच जमिनीच्या आरोग्याची काळजी घ्यावी, मोफत माती परीक्षणाचा  लाभ घ्यावा व त्यानुसार शेतीपद्धतीमध्ये बदल करावा, असे आवाहन माजी सभापती पंकज पेडणेकर यांनी केले. कृषि विभागाचे काम कौतुकास्पद आहे. असे ते म्हणाले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स यांच्यावतीने तळवडे येथे शेतकरी प्रशिक्षण माती परीक्षण व कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेडणेकर, सरपंच वनिता मेस्त्री, उपसरपंच गजानन जाधव, प्रा. रुपेश पाटील, आर.सी.एफ. चे जिल्हा प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण वराडकर, कृषी अधिकारी पंचायत समिती तथा प्रशासक एकनाथ सावंत, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे तालुकाध्यक्ष रवींद्र काजरेकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षता परब, किशोरी कुंभार, अंकिता बहिरे, प्राजक्ता गावडे, स्नेहल राऊळ तसेच विजय वाघमारे यशवंत गव्हाणे सावता घेरडे सुप्रिया सावंत छाया मेस्त्री सीमा घाडी विनोद काजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आजगाव अध्यापक विद्यालयाचे अध्यापकाचार्य प्रा.रुपेश पाटील म्हणाले की “आजच्या शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार उत्पादनाबरोबर विक्री तंत्रात बदल करावा व अधिकाधिक नफा मिळवावा.पारंपरिक शेतीमध्ये आधुनिकता व विक्रीचे नवे मार्ग शोधल्यास अधिक नफा मिळवता येईल,म्हणून तंत्रविज्ञान व आधुनिकीकरण याची जोड शेतीला हवी.”

उपसरपंच गजानन जाधव यांनी सांगितले की “कृषि विषयक विविध योजना व मार्गदर्शन यांचा लाभ घेऊन आपली प्रगती करावी .

ग्रामपंचायत सदस्य दादा परब म्हणाले की “माती परिक्षण हि काळाची गरज आहे हे ओळखून कृषि विभाग व आर सी एफ  ने योग्य उपक्रम तळवडे गावात राबवल्याबद्दल धन्यवाद दिले व हे काम शेतीचे उत्पादन वाढण्यास उपयोगी ठरेल.”

यावेळी मार्गदर्शन करतांना कृषि सहाय्यक यशवंत गव्हाणे यांनी सांगितले की “जमिन व माती हि पैश्यापेक्षा खरी संपत्ती आहे जी जास्त काल टिकून राहते . ती टिकवणे तिची सुपीकता टिकवणे व आपल्या पूर्वजांनी  जशी सुपिक जमीन आपल्या ताब्यात दिली तशीच पुढच्या पिढीकडे सोपवणे हि आपली सामाजिक बांधिलकी आहे .ही सुपीकता टिकविण्यासाठी नियमित माती परीक्षण करणे व त्यातील शिफारशीचा काटेकोरपणे अवलंब करावा कि ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल व निव्वळ नफा आधिक मिळेल श्रीकृष्ण वराडकर (प्रभारी सिंधुदुर्ग व गोवा,आर.सी.एफ) यांनी परिक्षणासाठी माती नमुना कसा काढावा? आर.सी.एफचे सामाजिक उपक्रम व विविध उत्पादने याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मोफत माती परिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले .

एकनाथ सावंत, सौ.सलोनी वंजारी (स्वस्तिक ॲग्रो सावंतवाडी) यांनी विविध जैविक व सेंद्रिय खते कीटकनाशके बुरशीनाशके  याबाबत माहिती दिली .विजयकुमार वाघमारे यांनी ७८ माती नमुने परिक्षणासाठी आर. सी. एफ कडे सुपूर्द केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तळवडेचे कृषि सहाय्यक यशवंत गव्हाणे यांनी केले.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!