🛑मराठी शाळा टिकवणे काळाची गरज – चंद्रकांत तायशेटे.
*🛑मराठी शाळा टिकवणे काळाची गरज – चंद्रकांत तायशेटे.*
*🛑कारिवडे कट्टा शाळेला मौल्यवान जमीन दान*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०१:-*“मराठी शाळा टिकून राहणे ही काळाची खरी गरज आहे. या शाळेत शिकूनच मी घडलेलो आहे, त्यामुळे गावाचे आणि शाळेचे ऋण कधीही विसरणार नाही. यापुढेही शाळेला लागणारे सर्व सहकार्य करण्याचे वचन मी देतो,” अशा भावना जि. प. पु. प्रा. शाळा, कारिवडे कट्टा येथील माजी विद्यार्थी श्री. चंद्रकांत अनंत तायशेटे यांनी व्यक्त केल्या.
मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी शाळेत शारदोत्सव व माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री. तायशेटे यांनी शाळेसाठी बहुमूल्य जमीन दान करून गाव व शाळेबद्दलचे ऋण फेडले. त्यांच्या या समाजहितार्थ योगदानाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांमार्फत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले. या प्रसंगी केंद्रप्रमुख श्री. वालावलकर सर, सरपंच सौ. आरती अशोक माळकर यांचाही सत्कार श्री. बाबा गावकर यांच्या हस्ते झाला. सरपंच सौ. आरती माळकर यांनी ग्रामपंचायतीतर्फे गावातील मराठी शाळा टिकून राहाव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी व्यासपीठावर देवस्थान प्रमुख श्री. बाबा गावकर, मुख्याध्यापिका सौ. तावडे मॅडम, श्री. अशोक माळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रवींद्र कारिवाडेकर, श्री. शंकर मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्या सौ. भाग्यश्री भारमाल, श्री. भाई पोकळे, श्री. आपा भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक उपक्रम सर्वांना मंत्रमुग्ध करून गेले. तर रात्री श्री. माऊली दशावतार नाट्य मंडळ, इन्सुली यांचा दणदणीत नाट्यप्रयोग रंगला. कारिवडे गावातील रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.
या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका सौ. तावडे मॅडम, श्री. राऊळ सर आणि विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
*श्रीसृष्टी कसाल*
एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध
🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹
कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर
बाजारपेठ १.५ किमी अंतरावर
मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर
पडवे कॉलेज २ किमी अंतरावर
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर
ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर
मालवण ३० किमी अंतरावर
आंगणेवाडी ३० किमी अंतरावर
कणकवली १५ किमी अंतरावर
कुडाळ २० किमी अंतरावर
बाराही महिने पाणी
अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट
रेडी पझेशनमध्ये बंगलो
📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल
☎️ *संपर्क :*
एस.पी. सामंत – 9422054923
सुजय सामंत – 7057310666
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

