आणखीकोकणमहाराष्ट्रसंपादकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 “सिंधुदुर्ग – व्यसनाचा विळखा, आवाज दाबण्याचा कट” खावे त्याला खवखवे

🛑 आम्ही तुमच्या मार्गात नव्हतो, आमच्या आडवे आलात ,आता आडवे घालूनच पुढे जाणार

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ संपादकीय : सीताराम गावडे

🎴सिंधुदुर्ग, दि-२९:- सिंधुदुर्ग हा किल्ल्यांचा, समुद्राचा, संस्कृतीचा आणि साधेपणाचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. पण आज परिस्थिती भयंकर बदलली आहे. किनाऱ्यावरच्या वाळूत खेळणारी पिढी आता अंमली पदार्थांच्या नशेत बुडताना दिसते आहे. पर्यटकांच्या माध्यमातून सुरू झालेला ड्रग्जचा प्रवाह आता थेट कोकणी तरुणाईच्या रक्तात शिरू लागला आहे.यावर आम्ही प्रकाश झोत शेवटपर्यंत टाकत राहणार किती ते आडवे या तुम्हाला आडवे घालूनच पुढे जाणार.
अंमली दार्थ चे ठिकाणे जिल्ह्यातील बहुतांशी समुद्र किनाऱ्यांवर गेल्या काही वर्षांत पोलिसांनी चरस-गांजा जप्त केल्याच्या घटना घडल्याउच्च भ्रू समाजातील मुले असल्याने पालकांनी निमुटपणे पणे तेरी भी चूप मेरी भी चूप असे सोडवून नेले.गोव्यातून येणाऱ्या पर्यटकांसोबत ड्रग्जची देवाण-घेवाण होते, अशी अनेकदा नोंद झाली आहे व ते सुर्य प्रकाशा एवढे सत्य आहे.
पर्यटनाच्या आडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा पुरवठा होतो, अशी स्थानिकांची तक्रार आहे.
तरुणाई व्यसनाच्या आहारी,१६ ते २५ वयोगटातील तरुण मोठ्या प्रमाणावर या विळख्यात सापडत आहेत. शाळा–कॉलेजातील विद्यार्थी “पार्ट्यां”च्या नावाखाली नशा करून आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत.
अंमली पदार्थांचा प्रभाव थेट गुन्हेगारी, चोरी, हिंसा, आत्महत्या या वाढत्या घटनांमध्ये दिसतो आहे.
*भावी पिढीवर होणारे परिणाम*
व्यसनाधीन झालेली पिढी उद्याचा समाज घडवू शकत नाही.शेतकरी कष्ट करून शिकवलेली मुलं शहरात जाऊन व्यसनाच्या आहारी गेली, तर त्या घराचं भवितव्य संपलं.शारीरिक, मानसिक व आर्थिक उद्ध्वस्तता ही पुढील १०–१५ वर्षांत कोकणातील सर्वात मोठी सामाजिक समस्या होऊ शकते.
*आवाज उठवणाऱ्यांचा गळा घोटण्याचा कट*
अंमली पदार्थांविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांवर खोटे आरोप, सोशल मीडियावर बदनामी,पोलिसांत तक्रारी, धमक्या अशा दबावतंत्राचा वापर केला जातो.”हप्ता घेतात, बातम्या विकतात” असे खोटे आरोप करून निर्भीड पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हा फक्त एका पत्रकाराचा प्रश्न नाही, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे.
*प्रशासनाची ढिलाई*
तलाठी–तहसील–प्रांत यातून सामान्य माणूस जमिनीच्या, कायद्याच्या भानगडीत वर्षानुवर्षे अडकून जातो, पण ड्रग्जचा प्रवाह थांबत नाही.पोलीस केवळ छोटी कारवाई करून मोठ्या रॅकेट्सना हात लावत नाहीत, अशी लोकांची तक्रार आहे.किनाऱ्यावर mushrooming झालेली होम-स्टे, शेड्स, रिसॉर्ट्स यांच्या कायदेशीर परवानग्या तपासण्याचे धाडस प्रशासन दाखवत नाही.
*काय करणे गरजेचे?*
किनाऱ्यावर २४ तास सतर्क विशेष पथक नेमावे.ड्रग्जविरोधी अभियानासाठी स्थानिक युवकांना स्वयंसेवी संघटनांमध्ये सामावून घ्यावे.
होम-स्टे, रिसॉर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स यांचे ऑडिट करून बिनपरवानगी धंदे तात्काळ बंद करावेत शाळा–कॉलेजांमध्ये व्यसनमुक्ती जागरूकता मोहीम राबवावी.
आवाज उठवणाऱ्या पत्रकारांना सामाजिक कार्यकर्ते यांना संरक्षण आणि न्याय मिळावा.
सिंधुदुर्गात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबून चालणार नाही.ड्रग्ज विरोधात लढणं ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.उद्याची पिढी वाचवायची असेल, तर प्रशासनाने तात्काळ कठोर पावलं उचलली पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!