आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 इन्सुली पागावाडी जि.प. शाळेच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात ‘शैक्षणिक छंद जोपासा’ असा संदेश..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि-२८:- जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, इन्सुली पागावाडी नं. ५ चा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा शनिवारी उत्साहात संपन्न झाला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दीपेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील ८५ वर्षांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या मेळाव्यास ५५ ते ६० माजी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक अशोक सावंत यांनी प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “प्राथमिक शिक्षण महत्त्वाचे आहे. याच वयात शैक्षणिक छंद जोपासत विविध पातळ्यांवर आपले नाव कोरले पाहिजे. त्यासाठी वाचन, श्रवण वाढविणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे. ध्येय गाठण्यासाठी प्राथमिक शाळेतच पाया भक्कम करण्याची गरज आहे.”

सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी त्यांच्या शिक्षणकाळात सुविधा कमी होत्या, पण आता सर्व सुविधा उपलब्ध आहेत, असे सांगितले. तर पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी चिंतन, मनन करताना अवांतर वाचन आणि संगणकीय प्रणाली जाणून घेण्यावर भर दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपेश सावंत म्हणाले, “मुलांना भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तुम्ही मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शिक्षणाची संधी वृध्दिंगत करत राहा.”

मेळाव्यास व्यासपीठावर माजी विद्यार्थी श्री. प्रकाश सावंत, श्री .अशोक सावंत, श्री. अभिमन्यू लोंढे, श्री. प्रताप सावंत, श्री. प्रभाकर मांजरेकर, श्री .नागेश सावंत, श्री. फास्कू फर्नांडिस, मुख्याध्यापक श्री. भास्कर माजगावकर, शिक्षक सुधीर गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले.

प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. भास्कर माजगावकर यांनी केले. त्यांनी शाळेच्या भौतिक गरजा, विद्यार्थ्यांची प्रगती व गुणवत्ता यावर आपले विचार मांडले. सूत्रसंचालन शिक्षक श्री. सुधीर गावडे यांनी केले, तर आभार श्री. गोविंद शेर्लेकर यांनी मानले.

*माजी विद्यार्थी संघाची निवड*

यावेळी इन्सुली पागावाडी जिल्हा परिषद शाळा नंबर ५ माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक अशोक सावंत यांची अध्यक्षपदी, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांची उपाध्यक्षपदी, दिपेश सावंत यांची सचिवपदी, आणि विवेकानंद नाईक यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. प्रभाकर मांजरेकर, भिवा मुळीक, बाप्पा सावंत, राजेंद्र सावंत, नागेश सावंत, फास्कु फर्नांडिस, कृष्णा नाईक, राजेश शिंदे, विलास सावंत, अशोक सावंत, अमर सावंत, ओमकार सावंत माजी विद्यार्थी यांची सदस्यपदी निवड झाली.

यावेळी भिमसेन सावंत,न्हानू सावंत, सुभाष सावंत, प्रथमेश सावंत, प्रमोद पेडणेकर, सदाशिव सावंत, ओंकार सावंत, नंदकिशोर सावंत, प्रेमानंद सावंत, गौरेश सावंत,अशोक मुळीक, भगवान सावंत, कुंदन सावंत, उर्मिला पडवळ, ञृतीक सावंत, पुजा सावंत,अक्षता धुरी, अस्मिता सावंत, गंगाराम शेळके, यांसह मोठ्या प्रमाणावर माजी विद्यार्थी उपस्थित होते तसेच शिक्षक श्री. हंसराज गवळे, अंगणवाडी सेविका श्रीम. सुगंधा परब आदी उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!