कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑नेमळेत बंद घर फोडून दागिने, रोकड लंपास.

*🛑नेमळेत बंद घर फोडून दागिने, रोकड लंपास.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* नवरात्र उत्सवकाळात नेमळे-कुंभारवाडी येथे दिवसाढवळ्या बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. चोरट्यांनी खिडकीच्या काचा तोडून घरात प्रवेश केला. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मोहनदास खराडे हे नेमळे-कुंभारवाडी येथे राहतात. ते सकाळी सहा वाजता कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले होते. त्या कालावधीत चोरट्यांनी संधी साधत खिडकीच्या काचा फोडून घरात प्रवेश केला. यावेळी बेडरुमचा दरवाजा उचकटून काढत कपाटाचे लॉक तोडून आत ठेवलेले ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ३५ हजार रोकड लंपास केली. खराडे हे दुपारी तीनच्या सुमारास घरी आले असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी पोलिसांना कळविले.

चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ते सापडले नाहीत. घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक टीम बोलवण्यात आली. पोलीस त्या भागात चोरट्यांचा शोध घेत असून शोधपथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. खंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!