*अमली पदार्थांच्या लिखाणा पासून रोखण्यासाठी बदनामीचा असाही फंडा
*बदनामी साठी असाही फंडा*
*किती त्य शिव्या घालून,आरो करून ऑडिओ व्हायरल करा..कर नाही त्याला डर कशाला*
सिंधुदुर्ग –
मालवण येथे अमंली पदार्थांचा शिरकाव,बोटी मधून अंमली पदार्थ येत असल्याचा संशय अशा आशयाची बातमी व्हायरल होताच मालवण मध्ये एकच खळबळ उडाली
मालवण चिवला येथील व्हाट्सअप डीपी वर फोटो खाली डाॅन म्हणून लिहिलेला गोवेकर नामक व्यक्तीचे मी व माझे कुटुंब वेर्ले येथे जात असताना वाटेत कित्येक फोन आलेत, एकदा फोन उचलला व मी प्रवासात आहे ऑफीस मध्ये पोहचलो की फोन करतो म्हणून सांगितले तरी त्याचे सारखे फोन येत होते सोबत कुटुंब होते व मी गाडी चालवत असल्याने फोन घेतले नाही.
संध्याकाळी ५.३०च्या दरम्याने सदर व्यक्तीचा पुन्हा फोन आला मी सुरवातीलाच स्पष्ट केले की प्रवासात होतो म्हणून फोन उचलला नाही.नाहीतर त्याला वाटेल डाॅन डिपी बघून घाबरला..त्याने बातमी देऊन बदनामी केली,तुम्ही जुगार वाल्यांकडून बातम्या छापून पैसे घेता आमच्या एका मित्राकडून पैसे घेतले,माझ्याकडे पुरावा आहे.
सावंतवाडीतील एक व्यक्ती त्याने नाव घेतले मी येथे देत नाही ती तुम्हाला टीप देते व तुम्ही बातम्या छापतात मी म्हटले त्या व्यक्तीचा काय संबंध कारन मला माहिती होते सदरची व्यक्ती काॅल रेकाॅर्ड करत आहे म्हणून पुन्हा पुन्हा तेच बोलत आहे मी सगळे ऐकून घेत होतो फक्त माझी बातमी कशी बरोबर आहे तेवढेच सांगत होतो,बाकी जेवढे काय तो बोलला ते ऐकूनच घेत होतो मी शेवटी विचारले तुमचे काय म्हणने आहे,तेव्हा तो बोलला आता सगळे एकत्र येऊन जे काय करणार त्याला सामोरे जावा मी हा बोललो आणि कोणी ओगी की जोगी नावाच्या माणसाने मला म्हणे पैसे पाठवले त्याचा स्क्रीन शॉट पाठवतो मी म्हणालो पाठव..कारन हा जोगी की ओगी याने जो कोण तयार केला त्याचा माझा संबंध नाही कींवा त्याने कधीही कसलेही अगदी जाहिरातचे देखील पैसे मला कधीही पाठवले नाही.त्यामुळे कर नाही त्याला डर कशाला…
मी फक्त एवढेच बोललो तोच जास्त बोलला .मी ऐंकत होतो..आणि हेच रेकाॅर्डिंग व्हायरल करून मला सीताराम गावडे याला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.अरे तू कुठचाही डाॅन असूदेस मला काही फरक पडत नाही,कारन ज्या गावाला मला जायचे नाही त्या गावच्या एस टी ची चौकशी मी करीत नाही.त्यामुळे तुझ्या अशा पोकळ धमक्यांना मी भीक घालत नाही मी अवैध धंदे,अमली पदार्थ यांच्या विरोधात लढत राहणार..कारन सत्य परेशान हो सकता है पराजित नही.. त्यामुळे तू एकतर्फी कितीही आरोप केले आणि असे कित्येक ऑडिओ व्हायरल केले म्हणून घाबरून जावून मी हा लढा सोडणार नाही.
आणि ज्या डिपी वर फोटोच्या खाली डाॅन लिहून कोण डॉन होत नाही,तू चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतलास एवढे लक्षात ठेव,आता जर तुझे काही चुकीचे धंदे असतील तर तूला सोडणार नाही,आणि ज्या अन्य पाच लोकांनी मला फोन केलेत तुझ्यासकट त्याची नावे पोलिस अधिक्षकांना संध्याकाळीच पाठविण्यात आली आहेत.तुम्हाला एवढी मिर्चि का झोंबली त्याचा तपास होणे गरजेचे आहे.
आता संपूर्ण समुद्र किनाऱ्याला असणारी हाॅटेल, त्यांच्या परवानग्या याचाही तपास करण्यासाठी मी महसूल यंत्रणेला पत्र देणार आहे,आम्ही कोणाच्या पोटाच्या आड येत नाही पण आमच्या आड विनाकारण येऊन बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडत नाही.
या बातमीवर मोठा रणकंदन होणार याची कल्पना मालवण मधील माझ्या सुत्रांनी दिली होती, अग्रलेख प्रसिद्ध व्हायच्या अगोदर सकाळीच एका प्रतिष्ठित डॉक्टराचा माझी मस्करी करण्यासाठी फोन आला ते म्हणाले ड्रग्स माफिया तूला शोधताहेत. आणि अग्रलेख प्रसिद्ध होताच रणकंदन माजले..मला फोन करून शिव्यांची लाखोली वाहिली,तुम्ही हप्ते घेतात,तुम्हाला हे दिसत नाही,आमचा धंदा बुडला आता अनैतिक धंदे बंद झाले,नाहितर तुम्हाला हप्ते मिळत होते,आमचे मीत्र देत होते असे आरोप सुरु होते मी फक्त माझ्या अग्रलेखावर आला की बाजू सांगत होतो..हे सगळे रेकाॅर्ड होत आहे हे पण माहित होते म्हणून मी काही उत्तर न देता केवळ ऐंकण्याचे काम केले व शेवटी सांगितले जे काही तुझ्या कडे पुरावे आहेत ते पाठव..कर नाही त्याला डर कशाला.
मी खोट्या बदनामीला बळी पडून रणांगन सोडून जाणार नाही,अजूनही जरी कोणी फोन करून तुम्ही हप्ते घेतात आम्ही तुम्हाला दिले असे सांगणारे फोन यांचेच पंटर करु शकतात,कारन ही लढाई लढताना अशी माणसे कोणत्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव मला आहे तरिही मी ही लढाई अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढणार सोडणार नाही,तुम्ही किती ते ऑडिओ व्हायरल करा मला त्याची पर्वा नाही.कारन गोवा बनावटी दारू पेक्षा भयानक हा अमली पदार्थांचा विळखा आहे.
एवढे मात्र निश्चित जिल्ह्यातील दहा व्यक्तींपासून माझ्या जिवितास धोका आहे असे पाचशे रुपयांच्या बाण्डवर लिहून तो बाॅण्ड पेपर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक,आमदार व जवळचे मीत्र यांच्या जवळ देणार आहे.
कारन अशा प्रवृत्तींची माणसे माझा वाटेत अपघात घडवून मारू शकतात,अपहरण करुन फासावर लटकवून आत्महत्या भासवू शकतात, पाण्यात बुडवून मारुन आत्महत्या भासवू शकतात..मी लढवय्या आहे असे कोणतेही कृत्य करणार नाही.मी जे बाण्ड पेपरवर लिहून ठेवले आहे त्या पैकी काहीही माझ्या बाबतीत घडल्यास त्या घटनेला त्या दहा व्यक्ती जबाबदार असणार आहेत.
मी तलवार म्यान केली नाही त्यामुळे गोवा बनावटी दारू अमली पदार्थ यांच्या विरोधात मी लढतच राहणार आहे..किती ते मला शिव्या घालून,बदनामी करुन ऑडिओ , व्हिडिओ व्हायरल करा,जनता ओळखते खरा कोण? खोटा कोण?मला तुम्ही करत असलेल्या बदनामीची पर्वा नाही.

