🛑 ग्रामस्थांचेच प्रश्न असले की सरपंच आजारी होतात काय? ; ग्रामपंचायत सदस्य राजन सावंत यांचा सवाल
🛑 आजारी असल्याचे कारण देऊन तीन महिने रजेवर गेलेल्या सरपंच एका कार्यक्रमात हजर ; यावरून नेमकं काय समजावं??
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२१ :– काही दिवसांपूर्वी साटेली – भेडशी ग्रामस्थांचे ग्रामपंचायत कार्यालया मध्ये ठिय्या आंदोलन सुरू होते. सतत तीन दिवस सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेत निरुत्तर झालेल्या सरपंच छाया धर्णे यांनी ग्रामस्थांचा विचार न करता आरोग्याचे कारण देत तीन महिन्यांची रजा घेतली,पण तेच सरपंच शनिवारी एका कार्यक्रमात उपस्थित होते यावरून नक्की काय समजावे असा प्रश्न साटेली – भेडशी ग्रामपंचायत सदस्य राजन सावंत यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे उपस्थित केला आहे.
ज्या ग्रामस्थांनी निवडून दिले त्यांचा विचार न करता एकाकी तीन महिन्यांची रजा घेणे आणि इतर कार्यक्रमांना हजेरी लावणे यावरून ग्रामस्थांच्या प्रश्नांबाबत आणि गावाच्या विकासा बाबत सरपंच किती सकारात्मात आहेत याचा विचार होणे गरजेचे आहे. ग्रामस्थांचे प्रश्न आणि समस्या असल्याकीच सरपंच आजारी पडतात काय असा सवाल देखील ग्रामपंचायत सदस्य राजन सावंत उपस्थित केला आहे.

