Uncategorizedमहाराष्ट्रसोलापूर

🛑सोलापूर : शुभराय मठात ओंकार महापुरुष भजन मंडळाची सुश्राव्य सेवा.

*🛑सोलापूर : शुभराय मठात ओंकार महापुरुष भजन मंडळाची सुश्राव्य सेवा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सोलापूर, दि- १८:-* सोलापूरच्या शुभराय मठात माजगाव येथील ओंकार महापुरुष भजन मंडळाने सादर केलेल्या स्वरचित सुश्राव्य भजनाने भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्य असलेल्या शंकर महाराज यांच्या मठात झालेल्या या भजन सेवेच्या वेळी संतपरंपरेची गोड आठवण जागृत झाली.

मंडळाचे एच. बी. सावंत यांनी स्वतः रचलेले अभंग व गीते सादर करून शंकर महाराजांच्या महतीचे रसाळ वर्णन केले. त्यांच्या स्वरचित अभंगांनी भाविकांचे हृदय भिजवले, तर मंडळातील इतर गायकांनी एकापेक्षा एक भक्तिगीतांनी मठातील वातावरण अधिकच पवित्र केले. या सुश्राव्य भजनानंतर ट्रस्टी श्रीमती शुभांगी ताई बुवा स्वतः भावूक झाल्या व मंडळाचा यथोचित सन्मानही केला.

यावेळी ‘श्री स्वामी समर्थ’ या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेत स्वामींची भूमिका साकारणारे अभिनेते अशोक कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनी मंडळाच्या या भक्तीसेवेचे कौतुक करत भजनाची व्हिडिओचित्रफीत खास मागवली.

भजन सेवेच्या पूर्वतयारीसाठी एच. बी. सावंत यांनी शुभराय मठासह शंकर महाराज, स्वामी समर्थ, दत्त, मारुती व अन्य देवतांवरील अभंगांचा अभ्यास करून, मंडळासोबत आठ दिवस माजगावात रियाज केला होता. या सेवेचे नियोजन विक्रम जाधव यांनी करून ट्रस्टी श्रीमती शुभांगी ताई यांच्याशी संपर्क साधला आणि तारीख निश्चित करण्यात आली.

या भजनात गायक म्हणून हनुमंत सावंत, विक्रम जाधव, अँड. चंद्रशेखर (सचिन) गावडे, अथर्व नाईक, विलास नाईक, ज्ञानेश्वर सावंत, गौतम सावंत आदींनी भाग घेतला. हार्मोनियमवर हनुमंत सावंत, तबल्यावर विवेकानंद सावंत व सोमेश्वर सावंत, तलरक्षक म्हणून संदिप गावडे यांनी साथ दिली. कोरस गायकांमध्ये ओंकार सावंत, रावजी सावंत, हरिष सावंत, संचित गावडे, अज्नेय गावडे सहभागी झाले.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीही या मंडळाने पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, सोलापूरचा शुभराय मठ व नरसोबावाडीचे दत्त मंदिर अशा राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांत भजन सेवा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली होती.

शुभराय मठातील यंदाच्या या सेवेमुळे ओंकार महापुरुष भजन मंडळाने पुन्हा एकदा आपली भजन परंपरेतील ओळख अधोरेखित केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

*श्रीसृष्टी कसाल*

 

एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध

 

🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹

 

कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर

 

बाजारपेठ १.५ किमी अंतरावर

 

मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर

 

पडवे कॉलेज २ किमी अंतरावर

 

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर

 

ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर

 

मालवण ३० किमी अंतरावर

 

आंगणेवाडी ३० किमी अंतरावर

 

कणकवली १५ किमी अंतरावर

 

कुडाळ २० किमी अंतरावर

 

बाराही महिने पाणी

 

अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट

 

रेडी पझेशनमध्ये बंगलो

 

📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल

 

☎️ *संपर्क :*

 

एस.पी. सामंत – 9422054923

सुजय सामंत – 7057310666

 

 

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!