🛑स्मार्ट मीटर बसविण्यास ओटवणे गावाचा विरोध.
*🛑स्मार्ट मीटर बसविण्यास ओटवणे गावाचा विरोध.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १७:-* गावात स्मार्ट मीटर बसविण्याच्या पत्राला मंगळवारी झालेल्या ओटवणे ग्रामसभेत कडाडून विरोध करण्यात आला. गावात स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटरसह टीओडी वीज मीटर बसविण्यास ओटवणेवासीयांचा प्रखर विरोध आहे. यापूर्वी गावात बसविलेल्या स्मार्ट, प्रीपेड, टीओडी वीज मीटरबाबत अनेक तक्रारी असून यापुढे गावात जुने वीज मीटर बसवावेत, असा ठराव मंगळवारी झालेल्या ओटवणेच्या ग्रामसभेत घेण्यात आला. याबाबत ग्रामपंचायतीना दिलेल्या पत्रानुसार, ग्रामपंचायत अधिकार क्षेत्रातील सर्व शासकीय वीज वापराचे कनेक्शन बदलून त्याठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत अंतर्गत येणारे नळपाणी पुरवठा, रस्ता लाईट, ग्रामपंचायत ऑ फिस, शाळा, अंगणवाडी इ.मीटर बदलण्यासाठी या कार्यालयाचे कर्मचारी येणार आहेत. त्यांना गावातील सर्व कनेक्शनची ठिकाणे दाखविण्यास मदत करावी. आपल्या कार्यालयाकडून सहकार्य मिळावे, असे नमूद करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी स्मार्ट, प्रीपेड किंवा टीओडी मीटर बसवणार नाही, असे लेखी आश्वासन महावितरणने दिले होते, त्याची आठवण करून दिली. स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात अनेक ग्रामसभांत ठराव झाले असतानाही वीज मीटर बदलण्यासह नवीन वीज जोडणीसाठीही स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी ग्राहकांना न विचारता गावात घरांमधील जुने मीटर व्यवस्थित असतानाही ते काढून हे मीटर बसविण्यात आले. या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा आर्थिक फटका बसणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जाणार नसल्याबाबतचा ग्राहकांना दिलासा दिला होता. मात्र,, चक्क मुख्यमंत्र्यांचा आदेश धाब्यावर बसवून स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. नाईक, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, तंटामुक्त समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सगुण गावकर, पोलीस पाटील शेखर गावकर, संतोष तावडे, रमेश वरेकर, प्रभाकर गावकर, धाकू बोर्ये, गुरु बुराण, नारायण भानसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

